मंगरूळपीर तालुक्यात मध्ये नवरात्री उत्सवास सुरुवात 41 मंडळात घटस्थापना.

70

मंगरूळपीर तालुक्यात मध्ये नवरात्री उत्सवास सुरुवात 41 मंडळात घटस्थापना.

ग्रामिण भागात दुर्गा मूर्तीची स्थापना न करता घट मांडून पूजा करण्यात आली.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी विनायक सुर्वे

मंगरुळपीर:-  तालुक्यात आज साधेपणाने घटस्थापना करण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत मंडळांच्या संख्येत मोजक्याच प्रमाणात घट झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 41 मंडळांमध्ये घटस्थापना झाली आहे. यात अनेक मंडळांनी मूर्ती स्थापना न करता घट मांडून आदिशक्तीची  पूजा अर्चा केली. तसेच, भक्तीमय वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात केली.

मंगरुळपीर शहर व ग्रामीण भागात दरवर्षी नवरात्री उत्सव उत्साहाने साजरा होतो. रस्ते विद्युत रोषणाईने नाहून निघतात. जिकडे नजर जाईल तिकडे आकर्षक सजावट, भव्य दिव्य मंडप, असे चित्र पाहायला मिळते. पण, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने नवरात्री उत्सवाला सुरवात झाली.
तसेच साध्या पद्धतीने नवदुर्गा उत्सव साजरा होणार असल्याने तसेच प्रशासनाच्या कोरूना पार्श्वभूमीवर ठरवून दिलेल्या निर्णयामुळे अनेक मंडळांनी नवदुर्गा स्थापना न करण्याचा निर्णय घेतला.

अनेक उपक्रमाना कोरोना चा फटका

नवरात्री उत्सवात अनेक दुर्गा उत्सव मंडळांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम घेतले जातात. यंदा मात्र कोरोनामुळे त्यावरही संक्रात आली आहे यात मा जिजाऊ नवदुर्गा उत्सव मंडळ शेलुबाजार आयोजित रुग्णसेवा ग्रुपच्या सहकाऱ्यांना मेडिकल कॅम्प घेत रोग निदान करून मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया केली जायची. मात्र, कोरोना काळात गर्दी टाळण्याच्या उद्देशाने हे सर्व उपक्रम रद्द करण्यात आले आहे.