जमीन आणि कायदा विषयी माहिती व्याख्यान मार्गदर्शन शिबीर सायन येथे संपन्न.

47

जमीन आणि कायदा विषयी माहिती व्याख्यान मार्गदर्शन शिबीर सायन येथे संपन्न.

जमीन आणि कायदा विषयी माहिती व्याख्यान मार्गदर्शन शिबीर सायन येथे संपन्न.
जमीन आणि कायदा विषयी माहिती व्याख्यान मार्गदर्शन शिबीर सायन येथे संपन्न.

गुणवंत कांबळे, प्रतिनिधी मुंबई
९८६९८६०५३०

मुंबई:- लोकसत्ताक स्टडी सेंटर येथे सर्व सामान्य नागरिकांना जमीन व कायदा या विषयी माहिती व्हावी. या हेतूने भारतीय लोकसत्ताक संघटना संलग्न लोक हितकारिणी संस्था (रजि) यांच्या वतीने दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता लोकसत्ताक स्टडी सेन्टर सायन येथे जमीनीचा ७/१२ उतारा वाचन व जमीनीचे विविध दस्ताऐवज व महसूल कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर विषयाचे मार्गदर्शक ऍड सुनिल भडेकर सर (विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन) आणि ऍड. रंजना खोचरे मॅडम (मुंबई उच्च न्यायालय) यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित असलेल्या बहुसंख्येने लोकांच्या समवेत माहिती देण्यात आली.

जमीनीचा ७/१२ उतारा वाचन व जमिनीचे विविध दस्तऐवज महसूल कार्यपद्धती व्याख्यान मध्ये सांगितलेले महत्वाचे मुद्दे ७/१२वाचन फेरफार आनेवारी पद्धत कुळ जमीन वंशावळी जुळवणे खोत जमीन पद्धत कुळात गेलेल्या जमिनीवर (बेदखल कुळे )पुन्हा वडिलोपार्जित वहिवाट वारस तपास हक्क रोड पत्रक जमीन मोजणी पद्धत सरकारी कार्यालयात जागेविषयी विविध दस्तऐवज अर्ज भूमि अधिग्रहण व वारस तपास महाराष्ट्र सेवा हक्क अध्यादेश जमिनीचे प्रलंबित विषय आपल्या जमिनीचे १२५ वर्षांपूर्वीचे कागदपत्रे उदा. बोटखत १८९५जंगलखर्डा १८८७(व त्याचा २०१७च्या ७/१२ उताऱ्याशी संबंध व दस्तऐवज लिंक) मुंबई कायदा वास्तव्य असणाऱ्या व्यक्तीच्या जमिनीचा / कुळाचा शोध मोडी लिपीतील जमिनीचे दस्तऐवज जमिन विषयक दस्तऐवज व माहितीचा अधिकार-२००५ आर.टी. आय. तलाठी सर्कल अधिकारी तहसील या विषयी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली.

सदर शिबिराला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समिती,संघटना, संस्था, पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व वकील अश्या अनेक दिग्गज व्यक्तीने या शिबिरात सहभाग घेतला होता. तसेच या कार्यक्रमाची लिंक लाईव्ह फेसबुक भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या पेजवर प्रक्षेपण करण्यात आली.
तसेच या शिबिरामध्ये महाराष्ट्र भरातून लोकांनी उपस्थिती दर्शवली होती.

संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते अमोलकुमार बोधिराज, विशाल गायकवाड, मनिष जाधव, सुप्रिया मोहिते, ऍड.रुपाली खळे, कमलेश मोहिते, योगेश मोरे, गुणवंत कांबळे, मितेश वळंजू, पिलाजी कांबळे, जान्हवी सावर्डेकर, संदीप आग्रे, अभिषेक कासे, अजय तायडे, मंगेश खरात, प्रेमसागर बागडे, श्रेयस जाधव, किरण गमरे, सुजल धाबे ई.उपस्थिती दर्शवली होती.