सौ.माधवी ताई जोशी युवा प्रतिष्ठान रायगड आयोजित गणपती मखर आरास स्पर्धा 2023 सत्कार सोहळा संपन्न
✍️संदेश साळुंके ✍️
कर्जत तालुका प्रतिनिधी
संपर्क :- ९०१११९९३३३
समाजात आपली ओळख निर्माण करत असताना या समाजाची भूक आपण ओळखली पाहिजे आणि त्या रीतीने आपली कार्यसेवा प्रत्येक जनसमुदाय पर्यंत पोहचवणे या निस्वार्थ हेतूने भावी खासदार माधवी ताई जोशी कार्यरत आहेत.
सौ.माधवी ताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठान रायगड व मावळ लोकसभा मतदार संघात भावी खासदार माधवी ताई जोशी यांच्या मार्फत गणपती मखर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .या स्पर्धेच्या गुणानुक्रमांकानुसर पारितोषिके स्वरूप प्रथम क्रमांक 26902,
द्वितीय पारितोषक 21902,
तृतीय पारितोषिक 11902,
अशाप्रकारे ठेवण्यात आले होते .
आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी. गणपती मखर स्पर्धेचा निकाल माधवी ताई जोशी युवा प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे जाहीर करण्यात आला.या स्पर्धेमध्ये पनवेल उरण विभागातून श्लोक अमित कदम भातान (पुठ्यापासून जेजुरी प्रतिकृती), रोशन शिवराम म्हस्कर नारपोली पनवेल (बाप म्हणजे काय सामाजिक विषयावर आधारित मखर), तेजस वामन लबडे खानवले (पत्रवल्यांपासून
सजावट).
याबरोबरच कर्जत खालापूर विभागातून तुषार संतोष बोराडे हलीवळी(वेस्ट पेपर पासून बेस्ट ),घन:श्याम अनंता तुपे लाडीवली(आपल्या पिढीचा जीवन प्रवास साकार करण्याचा छोटंसं विशेष प्रयत्न),
शांतनू सुमित मालुसरे आकुर्ले (स्वतःचे घराची उत्तम प्रतिमा),शुभम रामचंद्र बडेकर किरवली (सोन्याची जेजुरी छोटीशी प्रतिकृती),रामदास फावडे बीड(जनजागृती व्हावी म्हणून आपल्या गावाचा देखावा).विजेत्यांचा सत्काराचे स्वरूप प्रमाणपत्र,सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम असे होते.
विजेत्यांचा सत्कार भावी खासदार माधवी ताई जोशी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी तरुणाईचा वाढता ओघ पाहून सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला आणि तरुणाईच्या कलेला वाव देखील मिळत आहे हे पाहून अतिशय आनंद होत आहे.यापुढे देखील अशा प्रकारे जनसमुदायाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशाच प्रकारे विशेष उपक्रम राबविले जातील असे जाहीर करण्यात आले.