अखेर प्रतीक्षा संपली… माणगांवातील कचेरी रोड वरील असणाऱ्या बालोद्यानाचे काम पूर्ण

47
अखेर प्रतीक्षा संपली... माणगांवातील कचेरी रोड वरील असणाऱ्या बालोद्यानाचे काम पूर्ण

अखेर प्रतीक्षा संपली… माणगांवातील कचेरी रोड वरील असणाऱ्या बालोद्यानाचे काम पूर्ण

अखेर प्रतीक्षा संपली... माणगांवातील कचेरी रोड वरील असणाऱ्या बालोद्यानाचे काम पूर्ण

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी पॉस्को महाराष्ट्र स्टील च्या अधिकाऱ्यांनी उद्यानाचे केले भूमिपूजन.माणगांव मधील कचेरी रस्त्यालगत असलेले बालोद्यान बरीच वर्ष नादुरुस्त स्थितीत होते, पॉस्को कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व विषयांतर्गत याच्या नुतनीकरणाची जबाबदारी स्वीकारून आज रोजी उद्यानाचा पूर्ण कायापालट झाल्याचे अनुभवाला येत आहे. वरील कामांत नगरपंचायतीचा सहभाग व सहकार्य हे विशेष होते. पावसामुळे व अन्य काही अडथळे आल्याने काम पूर्ण व्हायला थोडा वेळ लागला यामुळे अनेक बालगोपाळांची उत्कंठा पणाला लागल्याचे दिसून आले पण अखेर बहुतांश कामं पूर्ण होऊन उद्यान सज्ज झाले आहे. जणू काही पोस्को कंपनी तर्फे माणगांव मधील किमान कचेरी रस्त्यालगतच्या परिसरातील मुलांना ही दीपावलीची सप्रेम व आनंददायी भेट ठरेल यात शंका नाही.

उदघाट्न प्रसंगी पोस्को कंपनीचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर, डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर, मॅनेजमेंट डिव्हिजन डायरेक्टर, सिनिअर जनरल मॅनेजर, व्यवस्थापन विभाग प्रमुख, जेष्ठ पत्रकार, नगरसेवक, नगर पंचायत अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक व उतेखोल शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना कंपनी कडून भेट वस्तू देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी उद्यानातील खेळणी खेळायचा आनंद लुटला, उद्यानातील सेल्फी पॉईंट हा आकर्षणाचा विषय आहे ज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेल्या हिंदवी स्वराज्याच्या प्रतिज्ञेचे स्वरूप साकारलेले आहे. 

येथे येणारी लहान मुलं, पालक व जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सुंदर बाकडी (बेंच),उद्यानाच्या बाहेरील बाजूस “रोजचा ध्यास १५ मिनिटे योग अभ्यास” असा संदेश देणारी १७ योगासने व सूर्य-नमस्कार चित्र लावण्यात आली आहेत यातून आरोग्य संपन्नतेचा ध्यास सगळ्यांनी घ्यावा ही अपेक्षा आहे. विशेष म्हणजे मुलांना खेळताना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणुन उद्यानातील जमीन उच्च दर्ज्याच्या कार्पेटने आच्छादित करुन अतिशय सुरक्षित अशी खेळणी बसविण्यात आली आहेत तसेच आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली, एकूणच या बालोद्यानात मुलांच्या सुरक्षिततेची मुख्यतः काळजी घेण्यात आली आहे.पोस्को कंपनी या पुढेही अश्याच कल्याणकारी उपक्रमांची आखणी करत राहील अशी ग्वाही कंपनी अधिकाऱ्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.