‘जय भीम’ शाॅर्ट व्हिडीओ ॲप लवकरच तरुणाईच्या भेटीला.

50

‘जय भीम’ शाॅर्ट व्हिडीओ ॲप लवकरच तरुणाईच्या भेटीला.

'जय भीम' शाॅर्ट व्हिडीओ ॲप लवकरच तरुणाईच्या भेटीला.
‘जय भीम’ शाॅर्ट व्हिडीओ ॲप लवकरच तरुणाईच्या भेटीला.

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. :- 9768545422

मुंबई:- तरुण-तरुणींमध्ये सध्या शाॅर्ट व्हिडिओ ॲपची क्रेझ आहे. यूट्यूब आणि इन्स्टाग्राम ॲपवर तरुणाई वेगवेगळे शाॅर्ट व्हिडीओ आवडीने तयार करतात. या प्लॅटफाॅर्मवर अनेकांचे लाखो फाॅलोअर्स आहेत. अनेक आंबेडकरी युवक-युवती देखील या प्लॅटफाॅर्मचा वापर करताना दिसतात. आता शाॅर्ट व्हिडीओ ॲपच्या यादीत ‘जय भीम’ नावाच्या शाॅर्ट व्हिडीओ ॲपची देखील भर पडली आहे. लवकरच तरुणाईला या ॲपचा वापर करता येणार आहे.

युट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या नंतर आता ‘जय भीम’ शाॅर्ट व्हिडीओ ॲप लाँच होणार आहे. लवकरच हे ॲप ‘गुगल प्ले’वर उपलब्ध होणार असून २६ नोव्हेंबर पासून डाउनलोड करता येणार आहे.

या ‘जय भीम’ शाॅर्ट व्हिडीओ ॲपवर युनिक प्रोफाइल बनवून प्रसिद्धी मिळवू शकता. तसेच तरुणाईला पैसे सुद्धा कमवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.