नगरपरिषद उपाध्यक्ष, कर्मचारी व अधिकारी यांचे कडून राजीवनगर मध्ये कलम १४४ चे उल्लंघन !

देवेंद्र सिरसाट.
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
हिंगना : -मंगळवार दि. १६ / ११ / २०२१ ला वानाडोंगरी राजीव नगर प्रभाग क्र. २ येथील नालीच्या बांधकामासाठी नगरपरिषद वानाडोंगरी चे कर्मचारी अधिकारी नालीवरील जूने अतिक्रमण हटवायला आले असता नगर परिषद उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ता यांनी सरकारी कामात अडथळा आणत प्रभागातील नागरिकांशी हुज्जतबाजी घालून बोट दाखवत पाहुन घेण्याच्या भाषेत भाष्य केले…. नागपूर जिल्ह्यात धारा १४४ कलम फौजदारी दंडसंहिता लागू असताना असे भाष्य करून नागरिकांचा जमाव निर्माण करणे व शांतता भंग करणे हे कितपत योग्य आहे? हा कायदा काय केवळ सामान्य नागरीकांना लागू पडतो लोकप्रतिनिधींना व शासकीय कर्मचारी यांना लागू पडत नाही आहे काय? असा सवाल सुद्धा स्थानिक नागरिक प्रशासनाशी करत आहे. तरी या बाबत आपण कोणताही विलंब न करता तात्काळ कारवाई करून नगर परिषद उपाध्यक्ष व नगर कर्मचारी व अधिकारी यांचेवर गुन्हा नोंद करून निलंबन करन्याची मागणी सतीश भालेराव यांनी
मा. विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर ,
मा.जिल्हाधीकारी नागपूर ,
मा. तहसीलदार हिंगणा ,
मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र.१ नागपूर (शहर)
मा.सहायक पोलीस आयुक्त एमआयडीसी विभाग नागपूर (शहर)
मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी विभाग नागपूर (शहर) यांचेकडे ई-मेल द्वारे तक्रार सादर केली आहे.