राष्ट्रीय ग्रंथ सप्ताह निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दिवाळी अंक, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
राष्ट्रीय ग्रंथ सप्ताह निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दिवाळी अंक, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

राष्ट्रीय ग्रंथ सप्ताह निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात

दिवाळी अंक, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्यूरो चीफ
9860020016

नांदेड :- भारतात दरवर्षी 14 ते 20 नोव्हेंबर राष्ट्रीय ग्रंथ सप्ताह साजरा करण्यात येतो. ज्याची सुरुवात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांचा जन्मदिन 14 नोव्हेंबर पासून होत असते. हा दिवस ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो.
या अनुषंगाने मुलांमध्ये व नागरिकांमध्ये वाचनाची आवड वाढून एक सुसंस्कृत वाचक समाज निर्माण व्हावा अशा उद्देशाने आहे. याअनुषंगाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे दिवाळी अंक व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी केले आहे. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी, राम मनोहर लोहिया वाचनालयाचे ग्रंथपाल संजय कारले, के.एम.गाडेवाड, श्रीनिवास इज्जपवार, संजय पाटील, ओमकार कुरुडे, गजानन कळके, रामगडीया महाराज, श्री. बुध्देवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here