कंगना रणावतवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून पद्मश्री पुरस्कार वापस घ्यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी.
=== मुख्य मुद्दे ===
●काटोल पोलीस स्टेशन मध्ये वंचितच्या वतीने तक्रार दाखल.
●राज्याचे गृहमंत्री व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांना काटोल थानेदारांच्या मार्फत निवेदन सादर.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 9766445348 📲
नागपुर/काटोल:- कंगना रणावत हिने भारत देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या बद्दल अपमान जनक विधान करून संपुर्ण देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. देशाला इंग्रजांच्या गुलामीतुन मुक्त करण्याकरिता भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मंगल पांडे सुभाषचंद्र बोस यासाराख्या. तरूणानी हसत हसत फासावर जावुन देशासाठी शहीद झाले. स्वातंत्र्याची लढत असताना अनेक महात्म्यानी जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता इंग्रजांना भारताबाहेर हाकलुन देशाला स्वातंत्र मिळवून देणे हेच ऐकमेव
लक्ष मनाशी बांधून शहीद झाले. आज भारत देशाविषयी सर्वाना अभिमान आहे. तिरंग्याची आन बाण शान कधीही खाली येवु देणार नाही. प्राण गेला तरी चालेल असे म्हणत सीमेवर शहीद होणारे आमचे भारतीय सैनीक आजही आम्ही पाहतो.
असे असताना कंगना रणावत सारख्या महिलेने भारताला.15 आगस्ट 1947 ला मिळालेले स्वातंत्र हे भीक होती खरे स्वातंत्र तर 2014 मध्ये मिळाले असे विधान करून तिने स्वातंत्र लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांचा भारतीय जवानांचा व संपुर्ण देशवासीयाचा अपमान केला आहे. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कठोर शिक्षा व्हावी व तिला नुकताच पद्मश्री पुरस्कार देवून गौरव करण्यात आला तिला पद्मश्री पुरस्कार कशासाठी दिला हे सुद्धा सरकारने जाहीर करावे व पद्मश्री पुरस्काराचाही तिने अपमान केला तेव्हा तो पुरस्कारही सरकारनी ताबडतोब परत घ्यावा असे मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगर पालिकेचे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांनी निवेदन देतेवेळी मांडले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कंगना रणावत यांच्या बाबतील पोलीस स्टेशन काटोल येते तक्रार दाखल करून तिचा पद्मश्री पुरस्कार वापस घ्यावा व तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी यासाठी थानेदारांच्या मार्फत राज्याचे गृहमंत्री व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या नावाने निवेदन सादर करण्यात आले.
काटोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करते वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिगांबर डोंगरे, सेवानिवृत्त कर्मचारी युनियनचे काटोल तालुका अध्यक्ष जानराव गावंडे, काटोल शहर अध्यक्ष सुधाकर कावळे, महिला आघाडीच्या काटोल शहर अध्यक्षा मिनाताई पाटील, विद्याताई तागडे, प्रा. विरेंद्र इंगळे, सुरेश देशभ्रतार, दिगांबर भगत, पंजाबराव काळभांडे, सुनिल वरघट, डॉ. सुनिल नारनवरे, रामराव पाटील, राज लोणकर, तुकाराम देशभ्रतार, दिनेश बोरकर, सिद्धार्थ वाहने, नंदू डबरासे, शैख कलीम अब्दुल रज्जाक, चंद्रशेखर बोरकर, रूपेश राऊत, मनोज गायकवाड, ओंकार मलवे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.