अपना बाजारच्या अमृत महोत्सवनिमित्ताने “मुंबईस्तरीय आंतरशालेय “भव्य चित्रकला स्पर्धा” आणि “बक्षिस वितरण सोहळा” मोठ्या उत्साहात संपन्न”…

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी

मो.नं.९८६९८६०५३०: अपना बाजारच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अपना बाजार ने भव्य अश्या स्वरूपात चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धा रविवार दि.१३ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबईत एकाच वेळी ७ वेगवेगळ्या ठिकाणी यशस्वी रित्या पार पडली. एकाच वेळी सात ठिकाणी स्पर्धा यशस्वी करणे तशी असाधारण, अशक्य वाटणारी गोष्ट सर्व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी शक्य झाली.

याच श्रेय अपना बाजार चे संचालक जगदीश नलावडे सर यांना जातं, त्यांच्या विचारातून आलेली अशी भव्य दिव्य संकल्पना प्रत्यक्षात आणणं मोठ्या जिगरीच काम होतं, परंतू त्यांचा दांडगा अनुभव पाठीशी असल्यामुळे आत्मविश्वास कुठेही कमी झाला नाही. सुरुवातीपासून जोरदार काम सुरू झाले ते स्पर्धा पूर्ण होई पर्यंत त्याच बरोबर अपना बाजार चे कार्याध्यक्ष श्रीपाद फाटक , उप कार्याध्यक्ष अनिल गंगर आणि सी. ई. ओ. एस. टी. काजळे.यांचे देखील मार्गदर्शन लाभले.

 

तसेच सरदार नगर शाखेचे पालक मंत्री / संचालक चंद्रकांत सोगले, श्रीमती दिपा जैन AGM, संचालक अमुल बिरवटकर, त्याच बरोबर शाखेची कार्यकरणी श्याम जाधव, राजीव कांबळी, विनोद बने ह्यांनी देखील वेळोवेळी सहकार्य केले.

 स्पर्धा केंद्र क्रमांक ३ (कर्मवीर दादासाहेब गायकवाड शाळा समूह, सायन कोळीवाडा, जीटीबी नगर,) चा स्पर्धा प्रमुख स्वप्निल कदम म्हणुन माझ्या नावाची निवड करण्यात आली. एवढी मोठी जबाबदारी माझ्याकडे आल्यामुळे सुरुवातीला थोडंसं दडपण आलं होतं, परंतु वेळोवेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभत होते, त्याच बरोबर परिवर्तन मुंबई या संस्थेत कार्यरत असल्यामुळे आणि परिवर्तन मुंबई आयोजित चित्रकला स्पर्धेच्या व अनुभवाच्या जोरावर कामकाज सुरू केले. परिवर्तन मुंबई चे सरचिटणीस योगेश कांबळे यांनी यात मोलाचे सहकार्य केले. 

सोबतीला मैत्रांगण टीम चे पाठबळ मिळाले, त्यामध्ये राहुल झोडगे, महेश सातपुते, रोहन गायकवाड, सागर भोईर, प्रतीक वनकेकर आणि सुशांत जाधव यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, त्यामुळे कामाला अधिक वेग मिळाला. सेलिब्रेशन झोन केक शॉप च्या टीम ने देखील विशेष सहकार्य केले. 

विभागातील १०० हून अधिक शाळांना वरील कार्यकर्त्यांनी भेटी देऊन स्पर्धेविषयी माहिती दिली. सगळ्या शाळांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, त्यामूळे हजारोच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

स्पर्धेच्या दिवशी अनेक Volunteers उपस्थित होते, विशेषतः स्थानिक प्रशिक मित्र मंडळातील कार्यकर्ते तसेच BPCA चे विद्यार्थी यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

शाळेचे मुख्याध्यापक, कर्मचारी वर्ग, डेकोरेटर, Sound System provider, त्याच बरोबर विश्वशांती बुद्ध विहार, आंबेडकर संवर्धन समिती यांनी विद्यार्थांच्या बैठक व्यवस्थेची सोय केली. स्पर्धेचे परीक्षक म्हणुन संदीप पाटील, महेश कदम , संजय नवले आणि शीतल तांबे ह्याचं परीक्षण केंद्र क्रमांक ३ ला लाभले. 

 स्पर्धेचे सूत्रसंचालन करणारे निवेदक निलेश सातपुते, कार्यक्रमाचे फोटोशूट ज्यांनी केलं ते करण जाधव आणि सहकारी, तसेच कोमल खुपते, अतुल शेजवळ यांचे देखील विशेष आभार कोणाचं नाव अथवा उल्लेख अनावधानाने राहिला असेल तर क्षमा असावी आपल्या सगळ्यांच्या अमूल्य अशा योगदानामुळे ही स्पर्धा यशस्वी रित्या पार पडली.स्पर्धा प्रमुख स्वप्रिल प्र. कदम (केन्द्र क्रमांक-३)यांच्या वतीने पुन्हा एकदा मनःपूर्वक सर्वांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here