स्पॉटलाईट: बदल काळाची गरज

69

बदल काळाची गरज

अंकुश शिंगाडे 

मो: ९३७३३५९४५०

आपण काम करीत असतो. कोणी चांगली कामे करतात तर कोणी वाईटही कामे करतात. कुणाला चांगले काम करण्यात आनंद वाटतो. कुणाला वाईट काम करण्यात. कुणाला निॉदा करण्यात आनंद वाटतो तर कुणाला परनिंदा अजिबात आवडत नाही.

आजच्या काळात आनंद हा ठरलेला आहे. आनंदाटे वेगवेगळे प्रकार आहेत. कुणी लेखन करण्यात आनंद मानतात. त्यांना वेगवेगळ्या विषयावर लिहिणं आवडतं. कधीकधी हे लिहिणं त्याच्या अंगावर येतं. कुणाला भाषण देण्यात आनंद वाटतो. परंतू कधीकधी तेही त्याच्या जिव्हारी लागतं. कारण लिहितांना आणि बोलतांना असे काही शब्द असतात की ते शब्द बोलणारा किंवा लिहिणारा व्सक्ती वेगवेगळ्या दृष्टीकोनातून वापरत असतो. परंतू वाचणारी किंवा ऐकणारी मंडळी ही व्यक्ती तेवढ्या प्रवृत्तीनुसार वेगवेगळा अर्थ काढून लिहिणा-या किंवा बोलणा-या व्यक्तीशी भांडत असतो. त्याचं कौतूक करीत नाही वा त्यानं ते लिहिण्याची वा बोलण्याची हिंमत दाखवली म्हणून त्याला कौतूकाची थाप देत नाही.

जनलोकांचं असंच आहे. पृथ्वीी गोल आाहे असं सांगणारा गँलिलिओ, त्यानं तसं म्हटल्यानंतर ते सहन न झालेल्या लोकांनी त्याला गळफास लावला. पृथ्वी सपाट आहे असं मानलं जाई. समुद्रात कोणीही लांब मासेमारीसाठी जात नसत. त्यांना वाटत असे की आपण पडून जावू कड्यावरुन. पृढे जेव्हा एका गलबतातील प्रवासी प्रवास करतांना त्याच जागेवर जेव्हा पोहोचले. तेव्हा कळलं की पृथ्वी गोल आहे. इथे सिद्धांत मांडणा-या साक्रेटिसला तो सिद्धांत सहन न झाल्यानं विष जबरदस्तीनं पाजण्यात आलं. पुढं ते तत्वज्ञान समोर आलं आणि लोकांनी ते स्विकारलंही. परंतू त्यासाठी साक्रेटिस व गँलिलिओला मरण पत्करावं लागलं. ते आधीच मरण पावले होते.

खिस्ती धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्तालाही येथील लोकांनी क्रुसावर चढवले. कारण ते मांडत असलेले तत्वज्ञान त्या काळात लोकांना पटलं नाही. ते तत्वज्ञान नंतर पटलं. इथे संत तुकारामाला जलसमाधी मिळाली आणि संत ज्ञानेश्वर माऊलीला स्वतःला गाडून घ्यावं लागलं आपलं तत्वज्ञान लोकांना समजावून सांगण्यासाठी. एवढंच नाही तर ज्यानं विजेच्या दिव्याचा शोध लावला, त्या एडीसनला त्यानं धानाच्या गंजीला आग लावल्यानं त्याच्या वडीलानं त्याला घरातून हाकलून दिलं व त्याचे प्रयोग करतांना आगगाडीत पिवळा फॉस्फरस सांडल्यानं त्याला रेल्वे कर्मचा-यांनी हाकलून दिलं. महत्वाचं म्हणजे अतिशय त्रास झाला त्यांना. 

 सतीप्रथा वाईट होती. परंतू ती बंद करतांना राजा राम मोहन रायांनाही त्रास झाला. तसेच विधवा पुनर्विवाह सुरु करतांना न्यायमुर्ती रानडेंना. खरंच सतीप्रथा व विधवा विवाह बंदी ह्या प्रथा चांगल्या होत्या का? केशवेपण आणि बालविवाह या प्रथा चांगल्या होत्या का? याचे उत्तर नाही असंच आहे. परंतू जो बदल झाला, तो रास्त बदल होता. तो बदल करणं अतिशय आवश्यक होतं. 

स्री शिक्षण बंद झाल्यानंतर ते शिक्षण सुरु करणारी आद्य शिक्षीका सावित्रीबाई फुले हिला लोकांनी त्या काळात शेण धसकटं मारली. तिनं शिकवू नये म्हणून. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. कारण अस्पृश्यांना प्यायला पाणी मिळावं व सन्मानानं जगता यावं. त्यावेळी बाबासाहेबांनाही किती त्रास झाला हे शब्दात मांडणे कठीण आहे. महत्वाचं म्हणजे बदल हा कोणीच स्विकारायला तयार होत नाहीत. त्यावेळी जो कोणी त्या बदलावर काम करतो. त्याला भयंकर त्रास दिला जातो. अक्षरश: त्रास दिला जातो. तरीही वेदना सहन करुन लोकं त्या बदलावर काम करीत असतात. त्यानंतर ब-याच काळानं तो बदल स्विकारला जातो.  

आजही तसंच आहे. आजही सुधारणा करणारा व्यक्ती सुधारणा करायला पाहतो. परंतू समाज त्याला सुधारणा करु देत नाही. पुर्वीही असंच होतं. लोकं स्वार्थ पाहात असत. त्यामुळं सुधारणा स्विकारत नसत. आजही प्रत्येकजण आपला स्वार्थ पाहात असतो. त्या स्वार्थामुळंच ते समाजातील सुधारणा स्विकारत नाहीत.

 महत्वाचं म्हणजे बदल हा काळानुसार हवा असतो. ज्याचा नंतरच्या काळात आपण स्विकार करतो. परंतू त्यासाठी आपण तो बदल होत असतांना तो होवू नये म्हणून विरोध का करावा?

 विशेष सांगायचं म्हणजे लोकं वास्तवीक जीवनात जीवन जगत असतांना असा विरोध करतात. मग नंतरच्या काळात त्याचा स्विकार करतात. असा आमचा इतिहास आहे आणि हा आमचा इतिहास असतांना का बरं असा विरोध करतात तेही कळत नाही. 

 महत्वाचं म्हणजे असा विरोध कोणी करु नये. बदल करणे ही काळाची गरज आहे. परंतू त्यासाठी हिंमत लागते. प्रत्येकाला परिवार आहे. हा परिवार सोडून प्रत्येकजण आज संक्रेटिससारखा वा गँलिलिओसारखा मरण स्विकारायला तयार नाही आणि आज तसा जीवही कोणीही आपल्या स्वार्थासाठी कोणाचा घेवू नये. तो बदल आनंदानं स्विकारावा. जेणेकरुन आपल्या येणा-या पिढ्यांंचं त्या बदलानं भवितव्य बनेल व ते तुम्हाला धन्यवाद देतील.