स्पॉटलाईट: पुरूष अश्रू लपवतात…

50

पुरूष अश्रू लपवतात

सौ. संगीता संतोष ठलाल

मु. कुरखेडा जि. गडचिरोली

मो: ७८२१८१६४८५

या पृथ्वीतलावर ती अशा बऱ्याच प्रकारच्या जाती आहेत. मग ते झाडांची असोत किंवा प्राण्यांचे असोत पण, सर्वात श्रेष्ठ दोनच जाती आहेत त्याच म्हणजेच स्त्री आणि पुरूष होय. या दोन जातीमुळेच आपणा सर्वाना खूप काही बघायला मिळत असतो. कारण, ह्या दोघांनाही बोलता येतं,चालता येतं जगातील साऱ्याच गोष्टी अगदी सहजपणे त्यांना समजत असतात. स्त्रीयांच्या बाबतीत तर..सर्वांनाच चांगल्याप्रकारे माहीतच आहे कारण, कोणत्याही स्त्रीचे मन हे हळवे असते, लवकरच तीला रडू पण येतं,व लवकरच राग सुध्दा येतो, तेवढीच तिच्याजवळ प्रेम,दया, जिव्हाळा, आपुलकी असते. कारण स्त्री अनेक कलागुणांनी भरलेली आहे. म्हणून तीला एक नाव कलागुणांची खाण सुध्दा असे दिले आहे. पण पुरूषांच्या बाबतीत बघितले तर…जरा वेगळेच आहे. 

 

जसे स्त्रीला अनेक नाते निभावून दाखवावे लागतात त्याच प्रमाणे कधी,कधी तेच नाते पुरूषाला सुध्दा निभावून दाखवावे लागते ही एक प्रकारची त्याची परीक्षाच म्हणावे लागेल. जसे,घर म्हटले की,भांड्याला,भांडे लागत असतात सासू सुनेचे भांडणं, बहीण,भावाचे भांडणं नंदा,भावजयीचे भांडणं,जावाजावांचे भांडणं, भावाभांवाचे भांडणं होतच असतात. एखाद्या वेळी बायकोच्या बाजूने बोलणे झाले की,मग आईला दुःख होते व आईच्या बाजूने बोलणे झाले की मग बायकोला दुःख होते. अशा वेळी त्या पुरूषाने काय करावे..? दोघीही त्याच्याच असतात. पण परिस्थिती मात्र वेगळी निर्माण झालेली असते. अशा वेळी तो पुरूष मनातल्या, मनात किती रडत असतो हे समोरच्या लोकांना त्याचे अजिबात अश्रू दिसत नाही. एवढी महानता त्या पुरुषांमध्ये असते. 

 

सर्वं कुटुंबाचा सांभाळ करतांना त्याला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तर..कधी, कधी उपाशी पोटी सुध्दा निजावे लागते. तरी त्याच परिस्थितीत तोच पुरूष म्हणत असतो की, तुम्ही जेवण करून घ्या मला भूक नाही माझं पोट भरलं आहे. कारण, उद्या आपल्या कुटुंबातील लोकांना जेवण कुठून भरवणार,मुलांचे शिक्षण पूर्ण कसे होईल, बहीण लग्नाची झालेली आहे,भाऊ सुध्दा शिकत आहे, म्हातारे आईबांबाना औषध कुठून आणणार ह्या चिंतेत तो पडलेला असतो. कदाचित त्या,पुरूषाच्या मनात काय चाललेले आहे हेच जाणायला कुटूंबातील लोकांकडे फारसं वेळ नसतो. ही फार मोठी शोकांतिका आहे शंभर टक्के खरे आहे. 

        

पुरूष कितीही दुःखी असला तरी आपले अश्रू कोणालाही दाखवत नाही. वेळ आली तर अनेक संकटाचा सामना तो एकटा करत असतो मनातल्या मनात तो रडत असतो पण,हिंमत न हारता पुढची वाटेवरती चालत असतो. व आपल्या कुटूंबाला साथ देत असतो. घरामध्ये काय आहे काय नाही याची सुद्धा त्याला काळजी असते. म्हणून तो त्या काळजी पोटी अस्वस्थ सुध्दा असतो. पण,आपले अश्रू मात्र लपवत असतो. पुरूष बरेचदा रडत असतो पण खऱ्याअर्थाने दोन दिवस जास्त रडत असतो. जन्म देणारे आई बाबा, जेव्हा हे जग सोडून जातात तेव्हा तो खूप रडत असतो,व दुसऱ्या वेळी म्हणजेच जेव्हा पहिल्यांदा लेक लग्न होऊन पाठवणी करते वेळी कितीही कठोर मनाचा पुरूष असेल तरी त्या वेळी तो बाप असतो. त्या प्रसंगी घरातील एका कोपऱ्यात उभा राहून खूप रडत असतो एका अर्थाने त्यावेळी तो बाप गरीब झालेला असतो. नंतर लेकीला पाठवणी करतेवेळी तिच्या कपाळी अक्षदा लावते त्यावेळी लेकीला उराशी घेऊन साऱ्या विश्वासमोर रडत असतो. कारण, त्यावेळी इतर दुसरा कोणीही नाही तर.. फक्त एक “बाप” असतो. 

       

आई तर आपल्या लेकरांवरती अफाट माया करत असते पण,बाप सुध्दा कमी करत नाही. हे सर्व जगाला दिसत असते. तिथे जमलेले लोक बाप लेकीचे रडणे पाहून आपणही ढसाढसा रडत असतात. व विचारात पडत असतात. स्त्रीयांच्या बाबतीत तर.. सारेच जण व्यक्त होतात तसेच पुरूषांच्या बाबतीत सुध्दा एकदा तरी व्यक्त व्हायला शिकले पाहिजेत. पुरूष जरी असला तरी त्याच्यात सुध्दा माया, ममता हिंमत,साहस, धैर्य असते,तो कष्टाळू,मेहनती असतो परिस्थिती कशीही असली तरी तो स्वतः जीवन जगण्याचा आणि आपल्या कुटूंबाला जगविण्यासाठी धडपडत असतो. सर्वांना सुखात ठेवण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो. कोणालाही दोष न देता प्रामाणिकपणे जगत असतो. समाजामध्ये राहणारे असे कितीतरी पुरूष आहेत की,ते स्वतः चा कधीही विचार करत नाही. सदैव कुटूंबाची,सोयऱ्या, धायऱ्यांची व आपल्या व्यवसायाची काळजी करत असतात. घरात कर्ता पुरुष असला की, कोणत्याही स्त्रीला कशाचीही फिकीर नसते ती, बिनधास्तपणे जगत असते. पण, खंत एका गोष्टीची वाटते की,पुरूषाच्या डोळ्यातील अश्रू मात्र तीला बघता येत नाही. अशा अनेक स्त्रीया,मुली,मुले,भाऊ, बहीण आहेत. फक्त, स्वतःचा आधी विचार करतात. आणि तो कर्ता पुरूष मात्र इतरांचा विचार आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत करत असतो. असे अनुभव, उदाहरणे आपण जवळून बघितले असणार ह्यात काही शंका नाही. म्हणून म्हणतात ना की, पुरूषासारखे जगण्यासाठी मोठे काळीज असावे लागते हे,फुकटच नाही. त्याचे काळीज मोठेच असते म्हणून तो,आपले अश्रू लपवून समाधानी जीवन जगत असतो. तेच समाधान कुटूंबातील लोकांचा सुख वाटत असते. असे काही पुरूष आजही कुटूंबापासून दूर राहून सुद्धा समाधानी जीवन जगत असतात. व आपले अश्रू लपवत असतात. हे, वास्तव सत्य आहे. एकदा तरी या विषयावर ती सर्वांनी विचार करायला पाहिजे.