भावी खासदार माधवी ताई जोशी आणि सुप्रसिद्ध उद्योजक नरेश जोशी यांनी घेतली खासदार श्रीनिवास पाटील यांची सदिच्छा भेट

50

भावी खासदार माधवी ताई जोशी आणि सुप्रसिद्ध उद्योजक नरेश जोशी यांनी घेतली खासदार श्रीनिवास पाटील यांची सदिच्छा भेट

संदेश साळुंके

कर्जत – मावळ प्रतिनिधी

मो: 9011199333

भावी खासादर, समाजसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ लोकसभा निरीक्षक सौ.माधवी ताई नरेश जोशी. ताई नेहमीच गोरगरिबांसाठी कार्यरत असतात. दुःखी,पीडित, कष्टीतांच्या अंधकारमय जीवनातील प्रकाशाचा एक तिरीम म्हणजे माधवी ताई जोशी. त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योजक,महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य मा.नरेश जोशी साहेब. दानशूर व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक कार्यकर्ता कल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट खासदार श्रीनिवास पाटील यांच्या खराड सातारा येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

श्रीनिवास पाटील हे मागील कार्यकाळात राज्यपाल देखील होते त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द उत्तम आणि वाखाणण्याजोगी आहे .आजच्या या भेटीदरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांवर विशेष मार्गदर्शन मिळाले याबरोबरच श्रीनिवास पाटील यांनी सौ.माधवी ताई जोशी आणि श्री.नरेश जोशी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.