चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाणेवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
समाधान सरोदे
धाराशिव: दि.१७ आज रोजी धाराशिव तालुक्यातील वानेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाणेवाडी विद्यार्थ्यांना चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला दप्तर, पाणी बॅाटल, एक डझन रजिस्टर, बिस्कीट इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी वानेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षक वर्ग व वानेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.









