स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात लातूर ग्रामीण मध्ये ठाकरे गटाची मुरुड या ठिकाणी उद्या तातडीची बैठक
दत्ता गोरे
लातूर: सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले आहे त्यामुळे सर्व पक्षांचे कार्यकर्ते नेते राजकीय पक्ष आप आपल्या ताकतीच्या बळावर महाविकास आघाडी महायुती तर कुठे मैत्रीपूर्व लढत याची अंमलबजावणी करत असतात आणि ही वस्तुस्थिती महाराष्ट्रा मध्ये आपण सध्या मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत परंतु लातूर ग्रामीणमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत होणाऱ्या निवडणुकी संदर्भामध्ये बैठकीच्या आयोजन केले आहे
या बैठकीमध्ये ०८ जिल्हा परिषद गटाचे व १६ पंचायत समिती गणाच्या साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महत्वाचे पदाधिकारी विभागप्रमुख शाखाप्रमुख गटप्रमुख बी एल ओ प्रमुख यांची व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सल्लंघन सर्व पदाधिकारी यांची गुप्त व तातडीची बैठक बोलवली आहे राज्यामध्ये सध्या नगरपरिषद नगरपंचायत याच्या निवडणुकीसंदर्भात आचारसंहिता असून निवडणुकीची तयारी पूर्ण तत्त्वावर आहे फॉर्म भरण्यापासून फॉर्म छाननी फॉर्म माघार ची वेळ आसून उमेदवार फोडाफोडी उमेदवार पळवा पळवी या गोष्टी सध्या पहावयास मिळत आहेत.
त्याचा अनुषंगाने लातूर ग्रामीणमध्ये उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे यांनी तातडीची बैठक ठेवली आहे त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर ग्रामीणचे तालुकाप्रमुख तालुका समन्वयक तालुका सचिव विधानसभा समन्वय तालुका संघटक उप तालुकाप्रमुख विभाग प्रमुख शहर प्रमुख शाखाप्रमुख गटप्रमुख बी एल ओ प्रमुख बूथ प्रमुख यांची तातडीची बैठक मुरुड या ठिकाणी बोलवण्यात आली आहे
त्यामध्ये शिवसैनिकांना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे हे मार्गदर्शन करणार असल्याचे माहिती सुत्राकडून मिळाली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे व महायुतीच्या बैठका होण्याअगोदर लातूर ग्रामीणमध्ये ठाकरे गटाची बैठक पाहावयास मिळत आहे त्या अनुषंगाने आपण आपल्या तयारीत राहावे अशी भूमिका बहुतेक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असू शकते त्यामुळे पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भामध्ये महाविकास आघाडी होईल अथवा न होईल हे नेतेमंडळी ठरवतील परंतु ग्रामीण लेवलला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते मात्र जोमाने काम करताना दिसत आहेत त्यामुळे लोकांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा पाहता शिवसेना ठाकरे गटाला याचा फायदा नक्की होईल त्यामुळेच ही बैठक तातडीची मुरुड या ठिकाणी घेण्यात आली आहे.









