मुबंई विद्यापीठ प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधात

50

मुबंई विद्यापीठ प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधात

विविध विद्यार्थी संघटनांचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो. क्र. 7715918136

पनवेल : मुंबई विद्यापीठ प्रशासनाने आंदोलनकर्ता पीएचडी संशोधक विद्यार्थ्याचा पीएचडी अभ्यासक्रमाचा प्रवेश रद्दबातल केला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या या मनमानी कारभाराविरोधात विविध विद्यार्थी संघटना आक्रमक होऊन अन्याया विरोधात एकत्र येऊन आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुबंई विद्यापीठ कलिना कॅम्पस मध्ये पालि विद्यार्थ्यांच्या विविध मागणी करिता पीएचडीचे विद्यार्थी राजेश बलखंडे (भंते विमासा) गेल्या तीन महिन्या पासून शांततामार्गाने उपोषणाला बसले आहेत.
त्यांना विद्यापीठ सुरक्षा आधिकारी व कर्मचारी यांनी मारहाण केली होती. याबाबत बिकेसी पोलीसानी मुबंई विद्यापीठ अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता भन्तेवरच गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भन्ते यांच्या आंदोलनाला तीन महिने पूर्ण झाले आहे मुबंई विद्यापीठ प्रशासन तोडगा काढण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
उपोषण कर्ते संशोधक विद्यार्थी राजेश बलखंडे (भंते विमासा) यांना बाजू मांडण्याची संधी दिली नाही उलट विद्यापीठ प्रशासनाने द्वेषापोटी आणि सूडबुद्धीने त्यांचा पीएचडी प्रवेश रद्दबातल केला आहे.
मुबंई विद्यापीठ प्रशासनाचा विविध विद्यार्थी संघटनाकडून निषेध करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांला कोणतीही पूर्वसूचना न देता, तसेच शोधनिबंधासंबंधी प्रगती अहवाल नियमितपणे सादर करूनही, मुंबई विद्यापीठाने एवढा कठोर निर्णय घेणे म्हणजे लोकशाहीचे हनन आणि संविधानाचे स्पष्ट उल्लंघन केला असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.
या विद्यार्थ्याच्या अन्यायाविरुद्ध विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी एकवटले असून या पुढे हे तीव्र आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत त्यांनी मुंबई पोलीस परिमंडळ–८, बीकेसी पोलीस स्टेशनचे उपायुक्त मनीष कणवालीया यांची भेट घेऊन
विद्यापीठाच्या अकार्यक्षम व मनमानी प्रशासनाविरुद्ध सविस्तर निवेदन सादर केले आहे.
मुबंई विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्याला येत्या सहा डिसेंम्बर पर्यन्त योग्य न्याय दिला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.
यावेळी काँग्रेसचे ॲड. निखिल कांबळे, युवासेनेचे
ॲड. संतोष धोत्रे, प्रहारचे
ॲड. मनोज टेकाडे, ॲड. अजय तापकीर, मनसे
ॲड. संतोष गांगुर्डे, छात्रभारती ॲड. रोहीत ढाले,पत्रकार जीवन तांबे,
अ.सा.फचे ॲड. विशाल गायकवाड,ॲड. जितूराज कांबळे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.