काटोल: अपंग बांधवांच्या हक्काच्या निधीसाठी न प मुख्याधिकारीना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन.

55

काटोल: अपंग बांधवांच्या हक्काच्या निधीसाठी न प मुख्याधिकारीना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन.

काटोल: अपंग बांधवांच्या हक्काच्या निधीसाठी न प मुख्याधिकारीना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन.
काटोल: अपंग बांधवांच्या हक्काच्या निधीसाठी न प मुख्याधिकारीना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन.

● सी.ओ धनंजय बोरीकर यांच्याशी केली सविस्तर चर्चा.
● वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिगांबर डोंगरे व अपंग बांधवांच्या आक्रमक भुमिकेपुढे झुकले प्रशासन.
● येत्या सोमवारला होणाऱ्या न प च्या सर्वसाधारण सभेच्या अजेंडय़ावर घेतला पहिलाच विषय.
● या महिन्याच्या अखेरपर्यंत अपंगांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे दिले लेखी उत्तर

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442

काटोल/नागपुर:- काटोल शहरातील शेकडो अपंग बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नाच्या पाच टक्के निधी अपंग बांधवांच्या कल्यानाकरीता त्यांना देण्यात यावा असा सन 1992 पासुन शासन आदेश असताना नगर पालिका काटोल नी फक्त 2018 ते 19 मध्ये 5000रु 2019 ते 20 ला विल चैयर व 2020 ते 21ला 2000 रु अपंग बांधवांना दिले. पण 1992 पासुन चा थकलेला निधी तर दिलाच नाही वर दिलेल्या वर्षातील तरतुदीनुसार 60 ते 70 लाख रु अपंग निधीचा वाटप सुद्धा नियमानुसार केला नसुन हा निधी दुसरीकडे वळता करून अपंग बांधवांचा नगर पालिका प्रशासन काटोल नी अपमान केला.

अनेकदा अपंग बांधवांनी नगर पालिका समोर आंदोलन केले खोटी आश्वासन देवून आंदोलन थांबवण्याचा प्रकार नगर पालिका प्रशासनानी केला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिवाळी च्या काळात नारे निदर्शने नगर पालिकेच्या प्रांगणात आंदोलन केले होते. दिवाळी संपताच 15 दिवसानी निधी देण्यात येईल असे नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी लेखी हमीपत्र दिले असताना आज दोन ते अदीज महिने लोटले पण ठरल्याप्रमाणे प्रशासनाने शब्द पाळला नाही म्हणून आज शहरातील शेकडो अपंग बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रुत्वात नगर पालिकेच्या मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांना निवेदन देवून आक्रमक चर्चा केली व आंदोलन कर्त्या लोकांचा आक्रोश पाहून शेवटी येत्या सोमवारला होवु घातलेल्या सर्वसाधारण सभेत पहिल्याच क्रमांकाचा विषय घेवुन धोरण ठरविण्यात आल्यानंतर डिसेंबर च्या शेवट च्या हप्त्यात अपंगाच्या खात्यात निधी जमा करण्याचे मुख्याधिकारी यांनी लेखी सांगितले.

नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत अपंग बांधवांना निधी देण्याचे हमी दिली असुन जर का यावेळेस अपंग बांधवांचा व आंदोलनाचा अपमान झाल्यास व ठरल्या प्रमाणे नगर पालिका प्रशासनानी दिलेला शब्द पाळला नाही तर, जानेवारीच्या पहिल्या हप्त्यापासून नगर पालिकेच्या प्रांगणात बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिगांबर डोंगरे यांनी नगर पालिका प्रशासनाला दिला.

यावेळेस पुरुषोत्तम सावरकर, प्रथमेश इजाटे, कादर शेख , दिगांबर सत्तेकार, अन्वर शेख हुसेन शेख, सुनिता चरडे, शंकर उमाठे, शंकर धोटे, कीसना भलावी, सरफराज जयस्वाल, प्रकाश उमाठे खन्ते यांच्यासह शेकडो अपंग बांधव उपस्थित होते.