डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेच्‍या अध्यक्षपदी विलास गायकवाड यांची बिनविरोध निवड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेच्‍या अध्यक्षपदी विलास गायकवाड यांची बिनविरोध निवड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेच्‍या अध्यक्षपदी विलास गायकवाड यांची बिनविरोध निवड

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-पनवेल तालुक्यातील नावडे गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्य व समाजामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजवण्याचं काम सातत्याने करत आली आहे. विविध कार्यक्रम राबवत समाजाला एकत्र करण्याचं काम विलास गायकवाड हे गेली अनेक वर्ष करत आहे. याची दखल घेऊन संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करून तरुण वर्गाला एक संधी दिली आहे. विलास गायकवाड हे अनेक संघटनेमध्ये पदावरती काम करत असून त्याचा अनुभव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था वाढवण्यासाठी व तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी कामी येईल असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला तसेच भीमराव निवृत्ती कांबळे उपाध्यक्ष, सुरेश शिंदे सचिव, प्रमोद राजहंस सहसचिव, गोरख अहिरे खजिनदार, धर्मेंद्र अहिरे सह खजिनदार, तानाजी लोखंडे सल्लागार, राजाराम कांबळे, आजिनाथ बनसोडे , रवींद्र मोरे,सचिन गायकवाड संघटक, नेहा ताई शिंदे महिला संघटक,सविता गायकवाड, नंदाताई कांबळे,चंद्रकांत नरवाडे अनिल खैरे, डॉ अपर्णा गायकवाड सभासद व संजय गायकवाड हिशोब तपासणीक पदी निवड करण्यात आली.
संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी काम करून त्यांना न्याय दिला जाईल असे मत अध्यक्ष निवडी दरम्यान विलास गायकवाड यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here