रोहा मध्ये इंटरनॅशनल स्पर्धकांसोबत" कोकण हिल चॅलेंजर्स मॅरेथॉन स्पर्धा "पार.

रोहा मध्ये इंटरनॅशनल स्पर्धकांसोबत” कोकण हिल चॅलेंजर्स मॅरेथॉन स्पर्धा “पार.

रोहा मध्ये इंटरनॅशनल स्पर्धकांसोबत" कोकण हिल चॅलेंजर्स मॅरेथॉन स्पर्धा "पार.

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रोहा :-रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका येथे आज रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी रोहा रोटरी क्लब आयोजित २१ किलोमीटर ” कोकण हील चॅलेंजर्स मॅरेथॉन स्पर्धा ” आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये प्रमुख जनशोभा चे समीर शेडगे, सचिन शेडगे, तसेच खासदार सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आमदार आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे , रोहाच्या तहसीलदार कविता जाधव तसेच रोहा नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर धीरज चव्हाण व पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर या सर्वांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात.” कोकण हील चॅलेंजर्स मॅरेथॉन स्पर्धा ” यामध्ये रायगड सह इतर राज्यातून व विविध ठिकाणच्या देशातून स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

या स्पर्धेमध्ये भाग घेणे म्हणजे स्पर्धकांची खरी कसोटी असते.
कोकणातील डोंगरदरीच्या नागमोडी वळणातून नयन रम्य वातावरणातून घनदाट पहाटेच्या धुक्याच्या अंधारातून वाट काढत ही स्पर्धा पूर्ण करायची असते.
त्यामुळे स्पर्धकाला ही स्पर्धा पार पाडणे हे मोठ्या जिगरीची असते.
परंतु या सर्व गोष्टींवर मात करून अनेक स्पर्धकांनी ही स्पर्धा पार केली. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या पुरुष, महिला व मुले यांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत भाग घेतला होता.

या स्पर्धेत प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकांना मेडल व ट्रॉफी आमदार आदिती तटकरे व पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या हस्ते देऊन स्पर्धकांना गौरवण्यात आले.
यावेळेस रोटरी क्लब ऑफ रोहा चे अध्यक्ष, नागोठणा रोटरी क्लब चे अध्यक्ष सहकारी व रोहा क्लबचे सर्व पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत आज हजारोंच्या संखेत स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धा पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here