श्री. सौ.माधवी नरेश जोशी यांनी घेतली
देहूरोड येथील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांची भेट
✒️ संदेश साळुंके ✒️
📞9011199333📞
कर्जत : -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ
लोकसभा मतदारसंघ निरीक्षक व भावी खासदार सौ. माधवीताई नरेश जोशी सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य
श्री. नरेशदादा जोशी
यांनी रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी देहूरोड येथील राष्ट्रवादी काँग्रस पक्ष कार्यालयास भेट दिली या भेटीदरम्यान देहूरोड विभागातील नागरी समस्या, महिलांचे सबलीकरण व युवकांना रोजगार या अनेक प्रश्नां संदर्भात चर्चा करून पक्ष संघटना बांधणी व पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने 9200 मतदारांची नावे कमी केली त्याबाबत सुप्रियाताई सुळे यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावू असे माधवीताई व नरेश जोशी यांनी सांगितले .त्याच बरोबर पक्ष कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यात आली.
यावेळी पक्ष कार्यालयात देहुरोड शहर अध्यक्ष मिक्की कोचर, महेश केदारी, देवराज स्वामी, कैलास गोरवे ,शिवाजी दाभोळे ,दीपक कसबे, रेणू रेड्डी ,रफिक शेख ,सुरेश भारस्कर ,समीर सतेलो, राजेश कदम ,गोविंद राऊत रोहित झेंडे ,हुसेन भाई ,महिला आघाडीच्या राजश्री राऊत, सुनीता विश्वकर्मा ,बॉबी डिका आदी सर्वजण उपस्थित होते .