थर्टी फर्स्टसाठी रायगड मधील समुद्रकिनारे सज्ज

थर्टी फर्स्टसाठी रायगड मधील समुद्रकिनारे सज्ज

थर्टी फर्स्टसाठी रायगड मधील समुद्रकिनारे सज्ज

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग : डिसेंबर महिना सुरू झाला की शाळा-महाविद्यालये, कार्यालयांत थर्टी फर्स्ट साजरा करण्याच्या चर्चा रंगलेल्या दिसतात. पर्यटनस्थळांवरील व्यावसायिकांनी आकर्षक सवलती जाहीर केलेल्या असल्याने मुंबई-पुण्यातील पर्यटक यंदा मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यात येणार आहेत.

थर्टी फर्स्टसाठी अद्याप 15 दिवस शिल्लक असले तरी 70 टक्के हॉटेल, लॉज बुक झाले आहेत. रायगडमधील पर्यटनस्थळांकडे येणार्‍यांमध्ये मुंबई, ठाणे, पुण्यातील पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी यंदा जिल्ह्यात साधारण चार लाखांहून अधिक पर्यटक दाखल होतील, असा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तवला जात आहे.

थर्टी फर्स्टसाठी काही दिवस शिल्लक असल्याने आता प्रत्येक ग्रुपमध्ये पार्टीच्या नियोजनाच्या चर्चा सुरू आहेत. सध्या थंडीचा कडाकाही वाढला आहे. शहरापासून जास्त दूर न जाता जवळच्याच पर्यटनस्थळांना भेट देण्याचे अनेकांचे नियोजन आहे. नारळी-सुपारीच्या बागांमध्ये असलेले कॉटेजमध्ये थर्टी फर्स्टची पार्टी आयोजित करण्याकडे पर्यटकांचे आकर्षण वाढत असल्याने यावर्षी दिवेआगर, नागाव, रेवदंडा, सासवणे, वरसोली येथील कॉटेज 70 टक्के बुक झाली आहेत. तर, हॉटेल, लॉजेसचीही ऑनलाइन बुकिंगने वेग घेतला आहे. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी लाखो पर्यटक रायगडमध्ये येणार असल्याने यामुळे पोलिसांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे. रायगड पोलिसांनी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. अमली पदार्थांची यादरम्यान आवक होऊ नये म्हणून अमली पदार्थविरोधी पथकही सक्रिय झाले आहे. सध्या रायगड जिल्ह्यातील तापमानात घसरण झाली असून सरासरी 18 अंश असलेल्या तापमानात सकाळचे दाट धुके पसलेले असते. त्याचबरोबर समुद्रदेखील अगदी शांत असल्याने समुद्रात पोहण्याचा आनंद मुंबई-पुण्यातील पर्यटकांना मनसोक्त लुटता येणार आहे.

हुल्लडबाज पर्यटकांना नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. त्याचबरोबर बाहेरून येणार्‍या पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची ही गंभीर समस्या आहे, अनेक वाद यावरूनच घडत असतात. वडखळ, मांडवा, पेझारी, कोलाड नाका, माणगाव येथे चेकपोस्ट करावे लागणार असून मद्यपी पर्यटकांची कसून चौकशी करावी लागणार आहे.

सोमनाथ घार्गे,
जिल्हा पोलिस अधीक्षक.

तीन, चार रूम मागच्या वर्षी जातानाच पुणे येथील पर्यटकांनी बुक केलेल्या आहेत. नोव्हेंबरपासूनच बुकिंगला सुरुवात झालेली आहे. या वर्षी वातावरण चांगले असल्याने पर्यटकांचा ओढा अलिबागकडे जास्त दिसून आहे, यासाठी ते बुकिंगसाठी विचारणा करीत आहेत.

मनोज घरत
सृष्टीफार्म थळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here