चेतना कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानित इयत्ता 11वी व 12वी च्या चालू तुकड्या बंद न करण्याचे भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाचे आव्हान.
मुंबई:- चेतना कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावी तीन व बारावीच्या तीन तुकड्या अश्या एकूण सहा तुकड्या बंद करण्यात येत आहेत. वास्तविक परिस्थिती पाहता वाढत्या लोकसंख्येनुसार विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे अश्या परिस्थितीत अनुदानित विद्यालयाची संख्या वाढवणे अपेक्षित आहे.
चेतना कनिष्ठ महाविद्यालयाने मा.उपसंचालक कार्यालयास शैक्षणिक वर्ष 2019-2020 उच्च माध्यमिक वर्ष 11 वी च्या तीन तुकड्या व शैक्षणिक वर्ष 2020-2021 उच्च माध्यमिक द्वितीय वर्ष 12 वी च्या तीन तुकड्या बंद करण्याची परवानगी मागितली आहे. ऑनलाईन पोर्टल वर एकूण 11वीच्या 9 तुकड्या आहेत आणि त्या तुकड्यामध्ये एकूण 1080 विद्यार्थी घेतले जातात . म्हणजेच आपल्या प्रत्येक तुकडी मध्ये 120 विद्यार्थी बसतात जर तीन तुकड्या बंद केल्यास 360 विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .सदर दोन्ही इयत्तेतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या 720 होते ,दर वर्षी 720 विद्यार्थी अनुदानित शिक्षणापासून दुरावले जाणार आहेत. सदर चेतना महाविद्यालयात विविध ठिकाणा वरील मुंबईतील सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थी चेतना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतात . सदर तुकड्या बंद करून सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत इयत्ता 11 वी व 12 वी च्या तुकड्या बंद करू नयेत अन्यथा विद्यार्थ्यांचा अधिकार हक्कासाठी आंदोलनाचा पावित्रा स्वीकारावा लागेल असे भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाने आव्हान केले.
विद्यार्थ्यांचे अधिकार हक्क व त्यांच्या भविष्याचा विचार करून जबाबदार संस्था व महाविद्यालय म्हणून इयत्ता 11 वी व 12 वी च्या सहाही तुकड्या बंद न करण्याचा निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी ही अपेक्षा करून प्रा.महेशचंद्र जोशी यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन देण्यासाठी भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष. अमोलकुमार बोधिराज सर, भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मनिष जाधव, सुप्रिया मोहिते, प्रेमसागर बागडे, कमलेश मोहिते, किरण गमरे, गुणवंत कांबळे, पिलाजी कांबळे, भाऊसाहेब सावंत, प्रणव संकपाळ, मंथन कासारे, चेतन लोंढे, सिद्धांत मगरे, अक्षय जाधव, दिपीका आग्रे, संदिप आग्रे उपस्थित होते.