कळमेश्वर तालुक्यातील ४ ग्राम पंचायत निवडणूकित केदार गटाचे वर्चस्व कोहळी -मोहळी मध्ये केदार गटाला छेद देत २ अपक्षांनी मारली बाजी.
तालुक्यात जी.प.व पंचायत समितीच्या निवडणूकीची पुनरावृत्ती सोनपूर- आदासा गट ग्राम पंचायत संपुर्णपणे बिनविरोध.
युवराज मेश्राम प्रतीनिधी
कळमेश्वर:- तालुक्यातील ५ पैकी १ ग्राम पंचायत अविरोध झाल्याने आज ४ ग्राम पंचायती करिता ता.१५ रोजी पार पडलेल्या निवडणुकीत ७९% मतदान झाले होते.आज पार पडलेल्या निवडणूकनिकालामध्ये ४ ग्राम पंचायती वर केदार गटाने आपले वर्चस्व राखीत गेल्या वर्षी पार पडलेल्या जी प व पंचायत समिती निवडणूक निकालाची पुनरावृत्ती केली असली तरी कोहळी – मोहळी ग्राम पंचायतीत केदार गटाला झटका देत २ अपक्षांनी मात्र बाजी मारली हे विशेष. ४ ग्राम पंचायतिच्या एकूण १३ प्रभागाकरिता ३८ ग्राम पंचायत सददस्याकरिता ९८ उमेदवार रिंगणात होते. आहे.या ४ ग्राम पंचायतिच्या निवडणुकीत एकूण ८३८० मतदारांपैकी ६६१७ मतदानाचा हक्क बजावला होता .यामध्ये पुरुष मतदार ३४०० तर स्त्री मतदार ३२१७ आदींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.
सोनपूर – आदासा गट ग्राम पंचायत ही ९ सददस्याची असून या ग्राम पंचायती करिता ९ च नामांकन दाखल झाल्याने ही ग्राम पंचायत बिनविरोध झाली. तालुक्यात होऊ घातलेल्या निवडणूकिमध्ये कोहळी- मोहळी , सावंगी – घोगली, सोनेगाव- पोही, सेलू-गुमथळा या ग्राम पंचायतीचा समावेश होता. आज पार पडलेल्या निडवणुकीचा निकाल आज लागला यामध्ये पुन्हा केदार गटाने आपले वर्चस्व राखीत भाजपा आघाडीचा सफाया केला.आज लागलेल्या निवडणूक निकालामध्ये सेलू – गुंमथळा येथे काँग्रेस ला ५ तर भाजप ला ४ जागा मिळाल्या, सोनेगाव – पोही (खैरी) येथे काँग्रेस ला ७ तर भाजपला २ जागा मिळाल्या , सावंगी – घोगली या ग्राम पंचायती मध्ये संजय तभाने गटाला ४, गुंडेराव हेलोंडे गटाला २, तर प्रज्वल तांगडे गटाला ३ जागा पटकावता आल्या तर कोहळी – ग्राम पंचायती मध्ये कॉग्रेसला ७,अपक्ष २, भाजपला २ जागा प्राप्त झाल्या.निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत विजय साजरा केला. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार सचिन यादव यांनी तर निवडणूक अधिकारी म्हणून जागळे , खंडाळ यांनी कामकाज पाहिले.