विदर्भातील सावित्रीच्या लेकींची आकाशझेप, विदर्भाच्या 25 मुलींना मिळाले प्लेसमेंट

51

ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत ग्रामीण विद्यार्थ्यांकरिता प्रशिक्षण केंद्राची परिणामकारकता 

विदर्भातील सावित्रीच्या लेकींची आकाशझेप , विदर्भाच्या 25 मुलींना मिळाले प्लेसमेंट.

युवराज मेश्राम ✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442

नागपूर:- संधी आणि साधन प्राप्त झाल्यास संधीच सोनं करण्यात मुली नेहमीच अग्रेसर असतात. विदर्भाच्या कन्यांनी आपल्या जिद्दीने व चिकाटीने पुन्हा परिस्थितीवर मात करत भरारी घेतली. ग्रामीण कौशल्य योजना (डीडीयू-जीकेवाय) व उमेद योजनेअंतर्गत ग्रामीण विद्यार्थ्यांकरिता प्रशिक्षण केंद्रे चालविली जातात. या प्रशिक्षण केंद्रांमध्ये बहुतांश ग्रामीण विद्यार्थी विविध कौशल्यांचे रोजगाराभिमुख प्रशिक्षण घेत असतात. लोणार येथील मेहमूदा संस्थेच्या डीडीयू-जीकेवाय केंद्राच्या मुलींना प्राप्त झालेल्या यशाने शासनाच्या या योजनेची परिणामकारकता पुन्हा दिसून आली.

लोणार केंद्रात प्लेसमेंट लेटर वितरण व नव्या बॅचच्या स्वागताचा कार्यक्रम पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री. सुनील केदार यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आला होता. किशोर गजभिये, प्रफुल्ल गुडधे पाटील, विवेक इलमे (प्रोजेक्ट डायरेक्टर – डीआरडीए नागपूर) व सय्यद मुमताझ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. संस्थेचे मार्गदर्शक माजी मंत्री अनिस अहमद व तुषार मेश्राम (डायरेक्टर – डीडीयू-जीकेवाय) कार्यक्रमाला हजर होते.

डीडीयू केंद्राने आतापर्यंतच्या वाटचालीत स्वास्थ्य, रिटेल व अतिथीसत्कार या क्षेत्रांत प्रशिक्षण देऊन 280 विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून दिला आहे. मागील बॅच मधील 25 मुलींना रिटेल क्षेत्राचे प्रशिक्षण देऊन, नेल्लोर येथील पीएफएसआई प्रायवेट लिमिटेड या नामांकित कंपनीत प्लेसमेंट मिळवून देण्यात संस्थेला यश आले. या कंपनीची विशेषता म्हणजे हि कंपनी संपूर्णपणे महिलांद्वारे चालवली जाणारी कंपनी आहे. लक्षणीय बाब अशी कि या मुली सावनेर, कळमेश्वर, वर्धा, अमरावती, गोंदीया सारख्या ग्रामीण भागातील आहेत.

श्री. केदार यांनी आपल्या भाषणात मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन मुलींना सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुढे चालवण्याची प्रेरणा दिली. उपस्थित सर्व पाहुण्यांनी मुलींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.