चंद्रपुर जिल्ह्यात प्रथमच आढळला दुर्मिळ "काळा गरूड" पक्षी निरीक्षणासाठी गेले असता झाला कॕमेरात कैद
चंद्रपुर जिल्ह्यात प्रथमच आढळला दुर्मिळ "काळा गरूड" पक्षी निरीक्षणासाठी गेले असता झाला कॕमेरात कैद

चंद्रपुर जिल्ह्यात प्रथमच आढळला दुर्मिळ “काळा गरूड” पक्षी निरीक्षणासाठी गेले असता झाला कॕमेरात कैद

चंद्रपुर जिल्ह्यात प्रथमच आढळला दुर्मिळ "काळा गरूड" पक्षी निरीक्षणासाठी गेले असता झाला कॕमेरात कैद
चंद्रपुर जिल्ह्यात प्रथमच आढळला दुर्मिळ “काळा गरूड” पक्षी निरीक्षणासाठी गेले असता झाला कॕमेरात कैद

✒अरुण रामुजी भोले✒
नागभिड तालुका प्रतिनिधि
📱9403321731

नागभीड : – दुर्मिळ समजला जाणारा ” भारतीय काळा गरूड ” जिल्ह्यात आढळून आला. हिमालय पर्वतरांगामध्ये नैसर्गिक अधिवास असलेल्या या गरूडाची महाराष्ट्रात फार कमी नोंदी आहेत. नागभीड येथिल पक्षीतज्ञ पक्षीनिरीक्षणासाठी गेले असता हा दुर्मिळ गरूड कॕमेरात कैद झाला. दुर्मिळ काळा गरूड दिसणे पक्षी मींत्रांसाठी पर्वणी ठरली आहे.

हिवाळ्यात स्थलांतरीत पक्षी मोठ्या संख्येने चंद्रपुर जिल्ह्यातील जलाशयात दिसू लागतात. स्थलांतरीत पक्षी बघण्यासाठी पक्षीमींत्रांची पाऊले जलाशयाकडे वढतात. नागभीड येथिल पक्षीतज्ञ डाॕ. जी. डी देशमुख यांच्या मार्गदर्शनात प्रा. निखिल बोराडे, प्रा. अमोल रेवसकर, संजय सुरजुसे हे किटाळी तलाव परिसरात पक्षी निरीक्षणासाठी गेले. तलावाचा पाळीवरील झाडावर दुर्मिळ भारतीय काळा गरूड त्यांना आढळून आला. त्यावेळी या गरूडाला त्यांनी कॕमेरात कैद केले.

भारतात काळा गरूड अशी ओळख असलेल्या या गरूडाचे शास्त्रीय नाव “इक्टिनिट्स मलाइन्सिस” असे आहे. हिमालय पर्वतरांगामध्ये या पक्षाचा अधिवास आहे. मैदानी प्रदेशात यांची नोंद अभावानेच आढळते.

असा दिसतो काळा गरूड
रंगाने पुर्णत काळा असल्याने याचे नाव काळा गरूड पडले.त्याचा चोचीच्या तळ गडद पिवळा रंगाची असते. तर पाय गर्द पिवळ्या रंगाचे असतात. हा शिकारी पक्षी असून सरडे, साप, उंदीर, घुस तर वेळप्रसंगी इतर लहान पक्षाची हा शिकार करतो, अशी माहीती डाॕ.जी.डी देशमुख यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here