क्रांतिवीर हिराजी पाटील ११० जयंती निमित्य अर्ध पुतळ्याचे लोकार्पण सोहळा; आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न…
संदेश साळुंके
प्रतिनिधी नेरळ
9011199333
नेरळ :-कोल्हारे ग्राम पंचायत हद्दीत क्रांतिवीर हुतात्मा हिराजी पाटील ११० जयंती निमित्य अर्ध पुतळ्याचे लोकार्पण सोहळा कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले असून एकूण इतर विकासकामांसाठी २४६.०६ लक्ष इतका निधी कोल्हारे ग्रामपंचायती साठी आमदार थोरवे यांनी सरपंच महेश विरले यांच्या विनंतीला मान देऊन कोल्हारेयेथे ऐतिहासिक कामे केली आहेत.
हुतात्मा हिराजी पाटील यांची प्रतिमा पुतळासाठी सरपंच महेश विरले यांच्या स्वखर्चातून रक्कम रुपये ७५,००० रुपये, चौक सुशोभीकरण पंचायत समिती सेस फंड रक्कम रुपये ६,००,००० रुपये,. हुतात्मा हिराजी पाटील चौथरा ग्रामनिधी ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे यांस कडून रुपये २,९९,००० रुपये दिले आहेत.