स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम व रस्ता सुरक्षा अभियान
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞
रोहा;-दि. १७ जानेवारी रोजी ११ ते १२ वाजता सी.डि.देशमुख विद्यालय ता.रोहा या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल लाड यांनी इयत्ता आठवी, नववी मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाविषयी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल लाड , पोलीस हवालदार प्रदिप झेमसे, मा.मुख्याध्यापिका सौ.विद्या धनवी, सहशिक्षक सौ विद्या घोडिंदे व सौ श्वेता सातपुते यांचे उपस्थितीत घेण्यात आला.