भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी शहराचा सर्वांगण विकास .केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील
✍️अभिजीत आर.सकपाळ✍️
भिवंडी, ठाणे (प्रतिनिधी)
9960096076
भिवंडी :- भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका
भिवंडी शहराचा सर्वांगण विकास करणे हेच शासनाचे ध्येय याकरता सदैव प्रयत्नशील..केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील भिवंडी शहराचा सर्वांगीण विकास करणे हे राज्य व केंद्र शासनाचे ध्येय आहे याकरता सर्वतोपरी प्रयत्न राज्य शासनाने केंद्र शासनामार्फत आपण करत आहोत शहराचा वाढता विकास लक्षात घेता शहरात पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे सक्षम पुढील वीस वर्षाचा पाणीपुरवठा अंदाज घेऊन योजना कार्यालयात करणे आवश्यक आहे.भिवंडीतील 100 एम एल टी पाणीपुरवठा योजनेचा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते सोलापूर येथून ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन, करण्यात आले, त्याला भिवंडी शहराचे भारतीय विकास लक्षात घेता भिवंडी शहराला पुढील भविष्यात पाण्याची चिंता भासू नये, भिवंडीची पुढील तीस वर्षांची चिंता मिटली भिवंडी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शासनाने मंजूर केलेल्या 426 कोटी रुपयांच्या 100 एम एल टी पाणीपुरवठा योजनेचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत 2.0 मध्ये समावेश करून या योजनेला मूर्त स्वरूप देण्यात आले असून या योजनेचा ऑनलाईन भूमिपूजन सोलापूर येथून मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी भिवंडी शहरातील ताडाळी येथील हनुमान मंदिर प्रांगणात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला, या प्रसंगी आमदार महेश चौघुले, आयुक्त अजय वैद्य,अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे,
विठ्ठल ठाके, उपायुक्त दीपक झिंजाड , माजी नगरसेवक संतोष शेट्टी,सुमित पाटील,निलेश चौधरी,हनुमान चौधरी,अँड हर्षल पाटील,महेंद्र गायकवाड यांसह पालिका अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिवंडी शहराची पाणी पुरवठा योजना ही मागील कित्येक वर्ष प्रलंबित होती,त्यासाठी सर्वांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने पाणी प्रश्न हे पूर्णत्वास येत आहे याचे सर्वांना श्रेय असून,भिवंडी शहराने घेतलेली मोठी झेप आहे असे प्रतिपादन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.ही योजना कार्यान्वित होण्याने शहराची पुढील तीस वर्षांची 60 लाख लोकसंख्येची तहान भागविली जाणार आहे असे शेवटी स्पष्ट केले.केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये शहराच्या विकासासाठी उपलब्ध झाल्याने भिवंडी शहर झपाट्याने बदलत असून शहरातील अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी 8 हजार घरांची प्रधानमंत्री आवास योजना राबविली जाणार असल्याचे सांगत,शहरात भारत विकास संकल्प यात्रेत सात दिवसात 3764 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिल्याचे प्रास्ताविकात आयुक्त अजय वैद्य यांनी सांगितले.याप्रसंगी भारत संकल्प यात्रा या उपक्रमांतर्गत विविध लाभार्थ्यांना आभा कार्ड, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान स्वनिधी इत्यादी लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे तसेच क्षय रुग्णांना निक्षय योजनेअंतर्गत पौष्टिक धान्य , प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.