जळगावात 52 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी पार पडले
✍️ निलेश सोनवणे ✍️
जळगाव तालुका प्रतिनिधी
मो 9922783478
जळगाव :- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव तसेच सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक 18 व 19 जानेवारी यादरम्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात 125 शाळांमधील विद्यार्थ्यांनी 119 प्रकल्प सादर केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आमदार गुलाबरावजी पाटील, पालकमंत्री, जळगाव. तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री. यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती कल्पना चव्हाण,माध्यमिक शिक्षणाधिकारी, जळगाव. या होत्या.
यामध्ये साधना माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी *कु.वेदिका राजेंद्र मोरे* हिच्या “कार्बन शुद्धीकरण” या उपकरणाला दिव्यांग प्राथमिक गटातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळून तिची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
वेदिका ही कासोदा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री राजेंद्र यशवंत मोरे तथा साधना माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती स्वाती ढोले यांची कन्या आहे.
तिच्या यशाबद्दल एरंडोल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.राजेंद्र डी.महाजन तसेच शालेय पोषण आहार अधीक्षक श्री.जे.डी. पाटील, तालुका विज्ञान समन्वयक श्री. अमोल वाणी सर त्याचप्रमाणे एरंडोल तालुक्यातील सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख व बीआरसी कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद तसेच जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे मानद सचिव सो. चेअरमन तथा संचालक मंडळ, व साधना शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी एल मोरे सर आणि सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे .