गुलाबराव पाटील तिसऱ्यांदा पालकमंत्री पद भूषविणार
✍️ निलेश सोनवणे ✍️
जळगाव तालुका प्रतिनिधी
मो 9922783478
जळगाव :- जळगाव जिल्ह्याला मा. आ. गुलाबराव पाटील तिसऱ्यांदा पालकमंत्री म्हणून मिळाले आहे. गुलाबराव पाटील यांचा हा कार्यकाळ जळगांव जिल्ह्यासाठी एक समृद्ध बनवण्यासाठी पुन्हा तयार आहेत. गुलाबराव पाटील हे सध्या महायुती सरकार मद्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत.त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील विकासाची गती वाढली आहे.शासकीय योजना,शैक्षणिक, वीज तसेच स्थानिक लोकांच्या समस्याकडे लक्ष देणे आणि त्याचे निराकरण करणे याच्या कडे त्यांचे खासकरून लक्ष असते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक सुविधा पुरवल्या आहेत. प्रत्येक काम करायची त्याची आगळी वेगळी पद्धत असते त्यामुळे ते रिअल मद्ये त्यांच्या मतदारसंघात हिरो आहेत. महाराष्ट्रात त्यांना शिवसेनेची मैदानी मुलुख तोफ म्हणून ओळखले जाते.त्यांनी त्यांच्या कार्य शैलीमुळे स्वतः चे अस्तित्व निर्माण केले आहे. कोणाचाही सुखाचा क्षण असो की दुःखाचा ते नेहमी वेळ काढून आपल्या मतदारसंघात जात असतात.जिल्ह्यातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तीप्रभावामुळे त्यांची तिसऱ्यांदा जळगांव जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून निवड झाली आहे. गुलाबराव पाटील पालकमंत्री पदी निवड झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटात आनंदाचा जल्लोष करण्यात आला.