इस्लामाबाद
पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी भारताने कोणतेही पुरावे नसताना पाकिस्तानवर आरोप केले आहेत, अशा शब्दात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे नाकारत भारताचे आरोप फेटाळून लावले आहेत. दहशतवादाच्या मुद्द्यावर आमची चर्चेची तयारी असून या हल्ल्याबाबतचे पुरावे भारताने आम्हाला द्यावे, असे आवाहनही खान यांनी भारताला केले आहे. मात्र, भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास पाकिस्तान त्याला उत्तर देणार नाही असे समजू नये, पाकिस्तान हल्ल्याला उत्तर देणार, असा धमकीवजा इशाराही इम्रान खान यांनी भारताला दिला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पाक पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.