Blood donation camp organized on behalf of Yuva Sambhaji Brigade Kinhala Branch.
Blood donation camp organized on behalf of Yuva Sambhaji Brigade Kinhala Branch.

युवा संभाजी ब्रिगेड किन्हाळा शाखेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित.

Blood donation camp organized on behalf of Yuva Sambhaji Brigade Kinhala Branch.
Blood donation camp organized on behalf of # Kinhala Branch.

प्रशांत जगताप प्रतिनिधी 19 फेब्रुवारी
हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातील किन्हाळा येथे महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्ताने युवा संभाजी ब्रीगेड द्वारा 18 फेब्रुवारी ला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन युवा संभाजी ब्रीगेड किन्हाळा शाखेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. डॉ. सुनील चावरे, जवाहर लाल नेहरू रुग्णालय सावंगी मेघे यांच्या डॉक्टरच्या टीम ने सहकार्य केले. युवा संभाजी ब्रीगेत आणी सामान्य नागरिकांकडून कोरोना वायरसच्या काळात हा मदतीचा हात असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

रक्तदानाच्या मुख्य दिवशी अधिकाधिक रक्तदात्यांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने गेले अनेक दिवस युवा संभाजी ब्रिगेट, मंडळाचे कार्यकर्ते आणि डॉक्टरांची तुकडी कार्यरत होती. रक्तदात्यांची पूर्वनोंदणी करून रक्तदाना विषयी मार्गदर्शन करुन. पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी नोंदणी केली होती. त्यात पन्नास पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान केल. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी किन्हाळा शाखेचे सर्व पदाधिकारी व संभाजी युवा ब्रिगेडचे सर्व सदस्य तथा दुर्गा बाल गणेश मंडळाचे सर्व सदस्य रक्त दान आयोजक म्हणून अमोल पाझारे व प्रणय पाटील यांनी योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here