वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित महाराजांना अनोखे अभिवादन.

Unique greetings to Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Nimit Maharaj on behalf of the deprived Bahujan Aghadi Pimpri Chinchwad city.
प्रतिनिधी 19 फेब्रुवारी
पिंपरी चिंचवड:- आज बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने लांडेवाडी येथील महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याचा मान वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मा. इंजि. देवेंद्र तायडे यांनी पुतळा परिसरात आपल्या दोन चिमुरड्यांसह पैशांची मदत मागणाऱ्या एका भटक्या विमुक्त प्रवर्गातील मरीआई समाजातील महिला व तिच्या दोन चिमुरड्यांना देत महाराजांना अनोखे अभिवादन केले.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्या नंतर तायडे यांनी त्या महिलेस व तिच्या दोन चिमुरड्यांना शिक्षण घेण्याचा सल्ला दिला व या बाबत पूर्ण मदत देण्याचे आश्वासन या वेळी दिले या प्रसंगी महिला आघाडी अध्यक्षा लताताई रोकडे,महासचिव गौरी शेलार, उपाध्यक्षा निर्मला कांबळे, शारदा बनसोडे,सुनीता वाघमारे, पल्लवी वाघ सुलक्षणा रायन,महासचिव राजन नायर,प्रवक्ता के. डी. वाघमारे,कार्याध्यक्ष अंकुश कानडी, उपाध्यक्ष सुनील गायकवाड,विशाल शिरोळे,संघटक बाबुराव फुलमाळी, कोषाध्यक्ष राजेश बारसागडे,सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे संतोष जोगदंड,वंचितचे धनंजय कांबळे, बबन सरोदे, महेंद्र सरोदे, राहुल बनसोडे, राहुल इनकर,रोहिदास गायकवाड,महेश कांबळे, अर्जुन गायकवाड, सतीश काकडे,अमोल माने, सचिन जावळे,नारायण कांबळे, राजू बनसोडे, प्रमोद शेलार आदी पदाधिकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.