शिवशाही युवक मित्र परिवार तर्फे ग्राम पंचायत कार्यालय मांडेसर येथे शिवजयंती साजरी

48

शिवशाही युवक मित्र परिवार तर्फे ग्राम पंचायत कार्यालय मांडेसर येथे शिवजयंती साजरी

शिवशाही युवक मित्र परिवार तर्फे ग्राम पंचायत कार्यालय मांडेसर येथे शिवजयंती साजरी

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८३२६८५५📲
📞८७९९८४०८३८ 📞

मोहाडी :- जगाच्या पाठीवर समतेचे व न्यायाचे राज्य निर्माण करुन माणसातील माणूसपण जागे करणारे, मानवतेच्या अस्मितेचे जनक विश्ववंद्य, कुळवाडीभूषण “छत्रपती शिवाजी महाराज ” यांची ३९२ वी जयंती १९ फेब्रुवारी २०२२ रोजी ग्राम पंचायत कार्यालय मांडेसर येथे संपन्न झाली.
या कार्यक्रमात प्रामुख्यानं उपस्थित राहणारे ग्राम पंचायत कार्यालय मांडेसर चे सरपंच श्री. गुलाबजी साव्वालाखे, उपसरपंच श्री. रोशनजी लिल्हारे, श्री. रविजी बशिने ( सामाजिक कार्यकर्ता ) श्री. मनोजजी दमाहे, श्री. जयपाल खोकले, श्री. प्रशांत नागपुरे, श्री. धनराज गराडे, श्री. संतोष लिल्हारे, श्री.श्याम लील्हारे श्री. फत्तेसिंग मालाधारी ( ग्राम. प. परिचारक) श्री,मुकेशजी भसगवळे ( कंप्युटर ऑपरेटर) श्री.रामदासजी चन्ने, श्री. आशिष सव्वालाखे, आणि सर्व ग्राम प. सदस्य, व गावकरी मंडळी उपस्थित होते,
सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते मिळुन सर्वप्रथम शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेची पुजा अर्चना केली.
व भाषणाला सुरुवात केली.
स्वराज्य निर्माते, बहुजनप्रतिपालक,कल्याणकारी राजे,कुळवाडीभूषण विश्ववंद्य जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्य कर्तुत्वाला त्रिवार वंदन….,
३९५ किल्ले जिंकून एकाही किल्यावर सत्यनारायणाची अथवा वास्तुशांतीची पुजा न घालणारे विज्ञानवादी राजे होते,
बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींना आपल्या स्वराज्यात स्थान देऊन खऱ्या अर्थाने जतीनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष समाज व्यवस्था निर्माण करणारे नीध:र्मी राजे होते. आग्रा दरबारात शेवटच्या रांगेत उभे केले म्हणून बाणेदारपणे दरबार त्यागणारे स्वाभिमानी राजे होते, शिवाजी महाराजांचे राहणीमान एकदम साधे होते, स्वारीला गेल्यावर शिवाजी महाराज तंबूत राहत असे, त्यांच्याकडे अधिकार वैभव असुनही साधेपणाने वागायचे, संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहन द्यायचे, त्याचे मनोबल वाढवायचे, ते कधीही चिंतेत राहायचे नाही,
सकारात्मकतेचा प्रेरणास्रोत असलेल्या शिवाजी महाराजांमुळे सर्वामध्ये एक वेगळी ऊर्जा यायची, प्रत्येक माळव्याचे शिवाजी महाराज आदर्श होते,आपल्या माळव्यांसाठी महाराजांनी ” विटा” नावाचे एक हतियार बनविले, विटा म्हणजे पुन्हा पुन्हा वापरता येइल असा भाला, हे हत्यार वापरुन फक्त ३०० माळव्यानी एक प्रसंग आपल्या रक्ताने इतिहास कोरून ठेवले, तो म्हणजे पावन खिंडीची घटना, “” गनिमीकावा”” हे शिवाजी महाराजांचे मेन हत्यार होते, अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमीकावा करुन जिंकल्या,
शत्रूचे सैन्य कितीही प्रचंड असले तरीही काही माळव्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी शत्रूचा पाडावाच केला, स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले,आणि जिंकले ,हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांकडे ४०० गड किल्ले होते, शिवाजी महाराजांने बुध्दी व चातुर्याने प्रचंड यश संपादन केले. असे भाषणात सांगितले व शिवभक्तांनी शिवाजी महाराज की जय, जय शिवराय, जय शंभुराजे जय शिवाजी असे नारे बोलून कार्यक्रम समाप्त केला.