वन विभागाने चपराळा देवस्थान समोरील दोरीचे कुंपण तत्काळ हटवावे : आमदार डॉ देवराव होळी

62

वन विभागाने चपराळा देवस्थान समोरील दोरीचे कुंपण तत्काळ हटवावे : आमदार डॉ देवराव होळी

वन विभागाने चपराळा देवस्थान समोरील दोरीचे कुंपण तत्काळ हटवावे : आमदार डॉ देवराव होळी

✍विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱

दिनांक 19 फेब्रुवारी 2022 ,
चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील कार्तिक स्वामी धाम चपराळा देवस्थान येथे दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्री यात्रा भरते या निमित्याने संपूर्ण देशभरातून भाविक भक्त पूजा अर्चना करण्यासाठी येथे पोहोचतात परंतु सदर देवस्थान वन विभागाच्या अभारण्यात मोडत असल्याने येथील विकास रखडला आहे
आजतागायत दरवर्षी लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येतात येथे अवागमन करतात परंतु येथील साधे रस्ते बनू शकले नाही ,अनेक विकासात्मक कामे पूर्ण होऊ शकले नाही ,त्यातच वारंवार अभारण्य वण्य जीव विभाग नेहमीच कायदाचा बडगा उगारत असतो यामुळे येथील देवस्थान समितीला अनेक
समस्यांचा सामना करावा लागतो
यामुळे भाविक भक्त यांना सुद्धा
अनेक असुविधांना समोर जावे लागत आहे ,
याबाबत आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ होळी यांना कळवण्यात आले व या तक्रारीची दखल घेऊन आज कार्तिक स्वामी
महाराज पुण्यतिथी निमित्त आ,डॉ होळी यांनी आज भेट दिली व दर्शन घेऊन देवस्थान समिती व भाविक भक्त यांच्या सोबत संवाद साधला व समस्या जाणून घेऊन वन विभागाच्या वन्य जीव अधिकारी यांना निर्देश दिले व गडचिरोली जिल्ह्यातील भाविक भक्तांच्या श्रध्देचा विचार करून वनविभागाच्या वन्य जीव विभागाने कायद्याच्या बडग्याचा अवलंब करावा असा सल्ला दिला
यावेळी प्रामुख्याने देवस्थान समितीचे प्रभाकर पंदीलवार , उपाध्यक्ष कुंदावार , सचिव विठ्ठल गारसे, सचिन नायर, दीपक माडूरवार , डॉ नलोडे , प्रकाश गौड , वनपाल मारोती पेदापल्लिवार , पवार साहेब, सुधाकर बत्तुलवार , तुकाराम गुरणुले ,व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ,