“कुणबी, तेली,धनगर, माळी, डेटा कुठ आहे ग, तू मंत्री नेता झालास मोठा रक्त ओबीसी जातीचे पिऊन समाजाच्या कामासाठी थोर विर झाले लोकशाही वाले नेते किती वाया गेले”असा पोवळ्याच्या मध्यामतून ओबीसी नेत्यांवर टीका करत ओबीसी क्रांती मोर्चा च्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/भंडारा :- जिल्ह्यात ओबीसी क्रांती मोर्चा यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली, या शिवजयंतीच्या माध्यमातून महापुरुषांची वेशभूषा धारण केलेले मुलं तसेच शिवरायांच्या जीवनशैली वर आधारित पोवाडे देखील गायले गेले, शिवाजी महाराजांच्या काळात महिला सुरक्षित होत्या मात्र आता महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारने शक्ती कायदा केला आहे, पण तो अमलात आणला नाही त्यामुळे कुठेतरी महिला असुरक्षित आहेत. शक्ती कायदा लवकरात लवकर अमलात आणावा अशी मागणी आता ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. तर नेहमीच ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याने कुणबी, तेली,धनगर, माळी, डेटा कुठ आहे ग, तू मंत्री नेता झालास मोठा रक्त ओबीसी जातीचे पिऊन समाजाच्या कामासाठी थोर विर झाले लोकशाही वाले नेते किती वाया गेले असा पोवळ्याच्या मध्यामतून ओबीसी नेत्यांवर टीका करत ओबीसी जनगणना लवकरात लवकर व्हावी अशी मागणी देखील या वेळी करण्यात आली आहे.