म्हसळा शहरात नगरपंचायतींच्या
वतीने शिवमिरवणुकीचे आयोजन
मिरवणुकीत रा. जि. प. मराठी शाळा नं. १चे विद्यार्थी सहभाग
✍️ संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा शहर प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा : – म्हसळा शहरात नगरपंचायतींच्या वतीने शिवमिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत रा. जि. प. मराठी शाळा नं. १ चे विद्यार्थी सहभागी होऊन शिवगर्जनेने म्हसळा शहर दुमदुमून निघाले, म्हसळा नगरपंचायतींच्या वतीने ३९४ वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी शहरातुन शिवमिरवणुक काढण्यात आली होती, शिवजयंती निमित्ताने नगरपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड व नगराध्यक्ष संजय कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. या मिरवणुकीत अनेक शिवप्रेमी सहभागी झाले होते,तसेच इयत्ता ४थी मधील पुष्कर पाटील हा विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषभुषेत दिसला तर आई जिजाऊ यांच्या वेषभुषेत स्वरा हेगिष्ट्ये व साईश्री म्हात्रे ही सईबाई यांच्या वेषभुषेत तसेच समर्थ करंबे याने उत्तम पोवाडा सादर केला तर काही विद्यार्थी हे मावळे बनले होते,या वेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनराध्यक्ष संजय दिवेकर,माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुनील शेडगे, नगरसेविका जयश्री कापरे, नगरसेविका सरोज म्हशिलकर, नगरसेविका राखी करंबे, ज्योती करडे,समीर बनकर, जेष्ठ पत्रकार उदय कळस, शाळा व्यवस्थापक कमिटी अध्यक्ष शशिकांत शिर्के, गणेश हेगिष्ट्ये, शिक्षकवृंद, नगरपंचायतीचे कर्मचारी वर्ग, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.