लोकसभेची रायगडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच असल्याचे दिले संकेत : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 

लोकसभेची रायगडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच असल्याचे दिले संकेत : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

लोकसभेची रायगडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच असल्याचे दिले संकेत : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 

किशोर पितळे
तळा तालुका प्रतिनिधी
९०२८५५८५२९

तळा :- तळा शहराच्या १३कोटी७०लक्ष रू.खर्चाच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपुजन सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात १७फेब्रु.२४रोजी पार पडला. तळा नगर पंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीच्या नागरीकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने खासदार सुनिल तटकरे, महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत तळा शहरासाठी खास करून १३ कोटी७०लक्ष इतक्या मोठ्या रकमेच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा प्रकल्पाचेभूमिपूजन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तळा हायस्कुलचे समोरील मैदानात खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झालेल्या स्वागत आणि पक्ष मेळावा कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रिय नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती च्या माध्यमातुन खासदारकीच्या सर्वच्या सर्व ४८जागा निवडूनआणुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यां दा पंतप्रधान पदावर विराजमान करायचेआहे. राज्यात लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने महायुतीच्या माध्यमातुन निवडणूका लढवल्या जातील आणि त्यात रायगडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच असणार आहे आणि ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे हेच उमेदवार असतील असे ठणकावून सांगितल. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी असलेला रायगड जिल्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा आतुट असा नातं आहे. युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शाहु,फुले डाॅ.आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड जिल्ह्यात खंबीरपणे उभा आहे.लोकप्रतिनिधी खमका असला तर विकासाचे सर्व प्रश्न सुटतात.आमदार म्हणून काम करताना सत्ताधारी पक्षाचा असल्याने जादा निधी दिला जातोअसे काहि नाही.विरोधकांना मिळत नाही असे नाही यावर भाष्य करताना येथील जनतेला खासदार सुनिल तटकरे,आमदारमंत्री आदिती तटकरे ,आमदारअनिकेत तटकरे हे विकास कामांत खमके लोकप्रतिनिधी लाभले आहेत.कामांत त्यांचा सतत पाठपुरावाअसतो. विकास कामांसाठी निधिची कुठेच कमतरता पडणार नाही असे आश्वासन दिले. नगर पंचायतीच्या प्रशासकिय इमारतीला ८लक्ष रु. निधी मंजूर केला.राज्यात महायुतीची सत्ता असताना गुण्या गोविंदाने कामे करा खेकडा वृत्ती मलाअजिबात आवडत नाहीविकासात सर्वपक्षीय सहभाग हवा सद्या राजकारणात आपापसातील भांडणे विकोपाला जातात हे बघीतले आहे राज्यात महायुती असताना स्थानिक पातळीवर राजकारण करू नये असा मार्मिक टोला हाणला.अजिदादांनी पक्षाने देशातील आणि राज्यातील राजकारणात घेतलेला निर्णय आणि परिस्थिती नुसार घ्यावा लागला सत्तेत सहभागीझालो. शिवसेना पक्षात झालेल्या घडामोडीमुळे उध्वव ठाकरे यांचा आघाडी सरकार पडला आणि जनतेला विकासा पासून वंचीत राहवे लागले.नव्याने मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीत का सहभागी झालो याची कारणे देताना अजितदादांनी मी जेबोलतो ते करतो त्याच्या पेक्षा जास्त फाफटपसारा वाढवत नाही.येथील मतदार संघातील वातावरण लक्षात घेता आम्ही सर्वधर्म समभाव जोपासणारे आणि जनतेच्या शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा पाढा वाचत असताना शेतकऱ्यांना पीक विमा, आर्थिक सहाय्य, शेतीसाठी 0% टक्के व्याजाने कर्ज पुरवठा,वीज,पाणी,रस्ते विकास राज्यांतील महीला आणि मुलींचा मान सन्मान वाढविण्यासाठी एकमेव महीला मंत्री आसलेल्या या मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने ४ थे धोरण मंजुर करून ८ लक्ष रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्च व तंत्र शिक्षण घेता यावे यासाठी निर्णय घेतला असल्याचे निदर्शनास आणून दिले.सुनिल तटकरे म्हणाले कि तळा तालुक्या च्या विकासासाठीविकास कामे आणण्याचा प्रयत्न करीतअसतो.त्यादृष्टीनेविकासकामेकेली.अजितदादाचे मोठे योगदान मिळत असते महायुतीच्या आघाडीने एकत्र येऊन विकास कामे करु मा.अदितीताई म्हणाल्या कि  दादांचे मोठे झुकते माप विकासासाठी तळेकरांना असते.तसेच तळगड किल्याच्या पर्यटन विकासासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली. आयोजीत भव्यकार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे,जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील, नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे शिवसेना तालुकाप्रमुख प्रघुम्न ठसाळ शहर प्रमुख राकेश वडके भाजप प्रदेश सचिव रवी मुंढे,माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे माजी उपनगराध्या सायली खातू सर्वपक्षीय नगरसेवक, सेविका,कोअर कमिटी सदस्य लिलाधर खातू,मंगेश देशमुख,तालुका महीलाअध्यक्षा जान्हवी शिंदे उपस्थीत होते यावेळी शिवसेना तालुका .प्रमुख ठसाळ यांनी पाणी पुरवठा योजना जन्माला घातल्या पासुनचे वृत्त विषद करुन आज आपल्या माध्यमातून लवकरच पुर्णत्वास जाईल याची खात्री होत असून आभार व्यक्त केले. तालुक्यातील जनता नोकरीसाठी शहरात खेडी ओस पडली गेली आहे.ती रोखण्यासाठी उद्योगधंदे कंपनी कारखाने उभारण्याची महत्वाची मागणी अजित दादाकडे केली.तालुक्यातील विविध मागण्याचे निवेदनातून गिरणे हाल खाडीवर पुल उभारणीसाठी लवकरच प्रयत्न केले जातील व ज्युनीयर काॅलेज अनुदानाचा प्रश्र मार्गी लावलाजाईल  केले मात्र कारखाने कंपनी याबाबत कोणतेही भाष्य केले नाही.आयोजीत सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे उपस्थितीत मानवंदना दिली. पोलिस बॅड पथकाच्या सुरेल महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here