जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान, पनवेल यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन…
उल्हास पुराडकर, पनवेल तालुका प्रतिनिधी
७०२८०९८६४२
पनवेल : – रक्तदानाला सर्वात मोठे दान मानले जाते. रक्तदानामुळे दुसऱ्यांचा जीव तर वाचतोच पण त्यासोबतच रक्तदान करणाऱ्या व्यक्तिलाही आरोग्याचे अनेक फायदे होतात.
पनवेल, दिनांक १९ फेब्रुवारी रोजी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थान यांच्या कडून सेक्टर – ११, खांदा कॉलनी, पनवेल या ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. १० फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या १० तालुक्यांच्या ठिकाणी आणि देशातील महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि कर्नाटक अशा ५ राज्यात सुद्धा रक्तदान शिबिरांचे संस्थांना तर्फे आयोजन करण्यात आले आहेत. अशा अनेक उपक्रमा सोबत संस्थांना तर्फे अपघातग्रस्त रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा आणि अवयव दान सारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.
रक्तदानाला महादान म्हणतात कारण ते इतरांना नवजीवन देऊ शकते. सामान्यत: लोक रक्तदान करण्यास संकोच करतात. कारण त्यांना असे वाटते की, यामुळे त्यांचे हिमोग्लोबिन कमी होईल आणि शरीरात अशक्तपणा येईल. पण रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीचा जीव तर वाचतोच, पण ते तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. रक्तदान केल्याने तुमचे शरीर अनेक आजारांपासून वाचते, तसेच मनाला ही सकारात्मकता येते.