चांदोरे ग्रामपंचायत येथे शिव जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

चांदोरे ग्रामपंचायत येथे शिव जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

चांदोरे ग्रामपंचायत येथे शिव जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

नंदकुमार चांदोरकर
माणगाव ता.प्रतिनिधी
8983248048

माणगाव : दि.१९/०२/२०२४ रोजी चांदोरे येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने ३९४ वी शिवजयंती साजरी करण्यात आली.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून सरपंच ताई साक्षी शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व नागरिकांचे सरपंच ताई यांनी स्वागत केले. त्या क्षणी पंचायत समिती मा.सभापती सुजित शिंदे, मानव अधिकार तालुका अध्यक्ष बाळाराम तांबे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ चिमण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवचरित्र आणि आजची परिस्थिती’ या विषयावर भाषण केले.
त्याक्षणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच साक्षी शिंदे. उपसरपंच नथुराम चाचले, तसेच ग्रुप ग्रामपंचयतीचे सर्व सदस्य, पं.स.माजी सभापती सुजित शिंदे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ चिमण,मानव अधिकार ता.अध्यक्ष बाळाराम तांबे, माजी सरपंच सखाराम मोहिते, विष्णु भोसले,आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, सी.आर.पी मनीशा जाधव, प्राथमिक शाळेतील शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.

पं.माजी.सभापती सुजित शिंदे यांनी प्रास्ताविक केले. आभार बचत गटाच्या अध्यक्षा सरिता मोहिते यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here