जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक ✍🏻
मो 9860020016
अमरावती, दि. 19 : – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, तहसिलदार विजय लोखंडे, अधीक्षक निलेश खटके, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार आदी उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
