कमलाकर काळू गायकवाड बेपत्ता; नेरळ पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात.

40

कमलाकर काळू गायकवाड बेपत्ता; नेरळ पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात.

संदेश साळुंके

कर्जत: अस्सल येथील रहिवासी कमलाकर काळू गायकवाड हे मानसिक तणावामध्ये असल्याने तसेच त्यांची स्मरण शक्ती कमी झाल्याने रविवार दि.१६/०२/२०२५ रोजी कोणासही काहीएक न सांगता अस्सल पोस्ट चिंचवली तालुका कर्जत येथून राहते घर सोडून गेले. ते अघ्याप घरी आले नाहीत म्हणून त्यांच्या मुलीने नेरळ पोलीस ठाणे येथे दि.१८ फेब्रुवारी रोजी नोंद क्र. ३० अशी हरवल्याची तक्रार केली आहे. कमलाकर यांचे वय ८०वर्षे, अंगाने सडपातळ, दाढी केस पांढरे, अंगात भगव्या रंगाचा शर्ट , काळ्या रंगाची फुल प्यांट व पायात चप्पल असे वर्णन आहे . त्यांच्या कुटुंबीयांनी कळमकर यांना शोधासाठी नेरळ पोलिसांना सूचना दिली असून पोलिस शोध कार्य करीत आहेत.

नेरळ पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणावर ते तपास करत आहेत. कोणत्याही माहितीसाठी कृपया नेरळ पोलिस ठाण्याशी ७५०७७ ४५३५३ पोलीस हवालदार (११९२) खंडागळे यांच्याशी संपर्क साधावा.