हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी
✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098
नागपूर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिमाखात साजरी करण्यात आली. केंद्र शासनाकडून प्राप्त निर्देशांच्या अनुषंगाने शहरात बुधवार १९ फेब्रुवारी रोजी राजे रघुजी भोसले स्मारक सक्करदरा ते गांधी गेट महाल पर्यंत ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची पदयात्रेला विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार श्री. आशिष देशमुख, आमदार श्री. अभिजीत वंजारी, माजी आमदार श्री. विकास कुंभारे, माजी आमदार श्री. दिनानाथ पडोळे, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, श्री अतूल लोंढे, विभागीय आयुक्त श्रीमती माधवी खोडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, उपायुक्त श्री. विजय देशमुख, श्री. मिलींद मेश्राम, डॉ. रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, मनपा क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, एनसीसीचे कर्नल गौतम कपूर यांच्यासह मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.