गोरेगांव मधे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
📞 7304654862 📞
मुंबई :- गोरेगांव पश्चिम मध्ये आज छत्रपती श्री. शिवाजी महाराजांची 395 वी जयंती मोठ्या उत्साहत साजरी करण्यात आली. मा. आमदार. सौ. विद्या ठाकूर यांच्या सौजन्याने व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय उत्कृष्ट, दिमाखदार, ढोल ताशांच्या गजरात, घोडे, रथ, जशी हुबेहूब, महाराजांच्या पेहरावात अदभूत असे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले असे प्रत्यक्षात वाटत होते.
भव्य दिव्य अशी मिरवणूक, गोरेगांव लिंक रोड पासून ते प्रेम नगर वरून एस व्ही रोड वरून पूर्ण गोरेगांव मधून काढण्यात आली होती. मिरवणुकीत महाराज्यांच्या पालखीचे जागो – जागी महिलांकडून आरती करण्यात येत होती. प्रचंड उत्साहत महिला, पुरुष, नवतरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसण्यात आला. मिरवणूकीला पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौज फाटा दोन्ही बाजूनी असल्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत होती. कार्यकर्त्यांच्या मेहतीने महाराजांची जयंती मोठया उत्साहात पार पडली.