आधार कार्ड नुतीकरण ठरतोय दोखेदुखी.
✒साहिल महाजन जिल्हा यवतमाळ प्रतिनिधी✒
वाढोणा बाजार:- शासकीय कामात आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे मात्र सदर कार्ड अद्ययावत असणे गरजेचे असल्याने आधारकार्ड नूतनीकरण्या साठी नागरिकांची धावपळ सूरू आहे. तर एसटी बस प्रवासात जेष्टाना 50 टके सवलतीसाठी अद्ययावत आधारकार्ड ची सक्ती करण्यात येत असल्याने जेष्ठ नागरिकांना उतारवयात आधार कार्ड केंद्राकडे हेलपाटे मारावे लागत आहे. कोणत्याही कामात ओळखपत्र मनून आधार कार्ड अनिवार्य केले आहे. पूर्वी आधारकार्ड जन्मतारखेच्या जागी केवळ इ. स उल्लेख होता दिनांक व महिण्याचा उल्लेख नव्हता मात्र आता शासनाने आधारकार्डवर दिनांक महिना व वर्ष असलेलेच आधार कार्ड ग्राह्य पकडण्यात येत आहे. त्यासाठी आधारचे अद्ययावतीकरण आवश्यक करण्यात आले आहे. एसटी प्रवास सवलत घेणारे बहुतांश व्यक्ती या आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या गटातील असतात त्याचे चेहरे वय सांगत असले तरी आधार च्या अद्ययावतीकरनाची सक्ती करण्यात आल्याने त्याच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. बस प्रवास सवलत योजणेत महामंळाने गेल्या काही महिण्यापासून विविध अटी टाकल्या आहे. त्यामुळे अनेक लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.