औरंगाबाद येथील घाटी रूग्णालया हलगर्जी कारभार; रुग्णांच्या नातेवाईकांना उभे राहावे लागते सलाईन धरून.

52

औरंगाबाद येथील घाटी रूग्णालया हलगर्जी कारभार; रुग्णांच्या नातेवाईकांना उभे राहावे लागते सलाईन धरून.

Care of Ghati Hospital at Aurangabad; Relatives of the patients have to stand up holding saline.

औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी

औरंगाबाद:- येथील शासकीय वैद्यकीय (घाटी) रूग्णालयातील आरोग्य विभागाचा आणखी एक हलगर्जीपणा समोर आला आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांचा नातेवाईकांना सलाईन हातात धरून उभे राहावे लागत आहे. कोरोना वायरस महामारीच्या दुस-या लाटेचे संकट सुरु असताना आरोग्य विभागाच्या अशा गलथान कारभारामुळे आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

वॉर्ड क्र. 15 मध्ये एका रुग्णाला लावलेल्या सलाईनसाठी स्टँड नसल्याने नातेवाईकाला चक्क हातात सलाईन धरून उभे राहावे लागले. हे चित्र फक्त वॉर्ड क्र. 15 मध्ये नव्हेच तर अपघात विभागात सुद्धा पाहायला मिळाले. या विभागातून दुसºया वॉर्डात रुग्णाला नेत असताना हातात सलाईन धरून जावे लागत आहे. घाटी रूग्णालयात मराठवाड्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र याठिकाणी सुविधांचा अभाव असल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी पायाला जखम व्यक्तीचा घाटीतील अपघात विभागाच्या पाय-यांंवर वेदनेने विव्हळत पडून मृत्यू झाला होता. यावेळी काही लोकांनी अपघात विभागातील डॉक्टरांना माहिती दिली. मात्र, वेळीच कोणीही त्यांच्याकडे धावले नाही. शेवटी पडल्या जागेवरच त्याने अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी वेळीच उपचार केले असते तर त्या व्यक्तीचा जीव वाचला असता, मात्र येथेही निष्काळजीपणा पाहायला मिळाला. तसेच वॉर्ड क्र.15 मध्ये एका नातेवाईकाने तर चक्क हातात सलाईनची बाटली व दुसरा नातेवाईक समोरून स्ट्रेचर ओढतो असे चित्र पाहायला मिळाले.

मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधार ठरलेल्या घाटी रुग्णालयातील रुग्णांना उपचारासाठी अपघात विभागापासून सिटी स्कॅनसाठी संबंधित वॉर्डापर्यंत नातेवाईकांनाच स्ट्रेचरवरून न्यावे लागत आहे. असे प्रकार नित्याचेच झाल्याचे काही रूग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.