Modi's government's brilliant plan came to the fore.
Modi's government's brilliant plan came to the fore.

मोदींची सरकारची महत्वकांशी उज्ज्वला योजना आली चुलीवर.

Modi's government's brilliant plan came to the fore.

✒मुकेश चौधरी विदर्भ ब्युरो चिप✒
वर्धा,दि.19 मार्च:- देशातील कोरोडो दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतुने केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गंत गॅसचे वितरण केले; मात्र, गत काही महिन्यात गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडल्याने तसेच सबसीडीही बंदच झाल्याने, उज्ज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असून धुरामुळे त्यांच्या डोळ्यात पुन्हा आसू आले आहेत.

उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आता सिलिंडर महागल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुलीवरच स्वयंपाक केला जात आहे; मात्र चूल पेटविण्यासाठी रॉकेल मिळत नसल्याने विस्तव पेटविण्यासाठी महिलांच्या डोळ्यांतून आसू येत आहेत. ग्रामीण भागातील 90 टक्‍के कुटुंबे सरपणाच्या माध्यमातून चुलीवरच स्वयंपाक करीत होते.

चुलीवरच्या धुरामुळे महिलांना श्‍वसनाचे आजार होतात. हे आजार कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ज्या कुटुंबाकडे गॅस उपलब्ध नाही, अशा कुटुंबांना सबसिडीवर गॅस उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता 90 टक्‍के कुटुंबांकडे गॅस आहे; मात्र स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे सर्वांचेच आर्थिक ‘बजेट’ कोलमडले आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतेत असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

2020मध्ये 599.50 तर आता 827 रुपयांवर
उज्वला योजनेंतर्गंत गॅस जोड मोफत मिळाले. काही महिने सबसीडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसीडी मिळत नसल्याने खुल्या बाजारातील दराप्रमाणे सिलिंडर घेणे परवडत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी जानेवारी 2020 मध्ये 714.50 रुपयांवर असलेले सिलिंडरचे दर जुलै 2020 पर्यंत कमी होत जाऊन 599.50 रुपयांवर आले होते. जानेवारी 2029 मध्ये हे दर 699.50 रुपयांवर पोहचले, त्यानंतर महिन्यात पुन्हा भाववाढ होऊन फेब्रुवारी 2021मध्ये सिलिंडरचे दर 789. 50, तर मार्च 2021 मध्येही गॅस सिलिंडरची भाववाढ होऊन सिलिंडर 827 रुपयांवर पोहोचला आहे.

वर्धा जिल्हातील हजारो ग्राहकांनी फिरवली पाठ
केंद्र सरकारच्या ‘उज्वला योजनेंतर्गंत’ मागील दोन-तीन वर्षामध्ये वर्धा जिल्हातील हिंगणघाट, देवळी, पुलगाव, समुद्रपुर, आर्वी, सिन्दी रेल्वे, सेलु, आष्ठी, पवनार येथील ग्रामीण भागातील जनतेला गॅस एजन्सीच्या माध्यमात लाभार्थ्यांना गॅस कनेक्‍शन मोफत देण्यात आले आहेत. उज्ज्वला योजनेअंतर्गत हजारो गॅस जोड लाभार्थी असले तरी, यामधील आता हजारो उज्ज्वल योजनेअंतर्गत असलेले लाभार्थी सिलिंडर महाग आणि इतर काही कारणाणे सिलिंडर भरून नेत नाहीत. दिवसेंदिवस गॅस सिलिंडरची महागाई वाढत चालल्याने गॅस विक्रीवरही यांचा परिणाम मागील काही महिन्यांपासून होत आहे, अशी माहिती गॅस एजन्सी आणि नागरीकांनी सांगितले.

उज्वला योजनेंतर्गंत गॅस मिळाल्याने आनंद आला होता; मात्र महागडा सिलिंडर घेणे वापरणे परवडत नाही. आम्ही दिवसभर उन्हा-तानात राबल्यावर 150 रूपये मिळत्यात. आणि त्या सिलिंडरच्या मड्यावर कुठे 800 रूपये खर्च करायचा. आम्ही मग खायचं काय ? त्यामुळे बिन खर्चिक चुलीच बरी. असे वर्धा जिल्हातील अनेक महिलांनी प्रतिक्रीया दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here