“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद.”

50

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद.”

"Spontaneous response to Maharashtra Navnirman Sena member registration."

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा वरोरा तालुक्याच्या माजरी कुचना क्षेत्रातील असंख्य तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणीचे फॉर्म भरून उत्साहात प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. यावेळी प्रतिष्टीत नागरिकांचे प्रवेशानंतर मान्यवरांतर्फे स्वागत करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या, व राजसहेबांचे विचार सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आव्हान यावेळी सदस्यांना करण्यात आले.

सदर कार्यक्रम मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात पार पडला यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनसे जिल्हाउपाध्यक्ष राजू कुकडे, बल्लारशाह जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, कुचना, थोराना उपसरपंच मनोज तिखट व मनवीसे तालुकाउपाध्यक्ष कारण नायर उपस्थित होते.