Statement to Tehsildar for various demands of Kotwal Association Etapalli.
Statement to Tehsildar for various demands of Kotwal Association Etapalli.

कोतवाल संघटना एटापल्ली चे विविध मागण्यासाठी तहसीलदाराना निवेदन.

 Statement to Tehsildar for various demands of Kotwal Association Etapalli.

✒️मारोती कांबळे, एटापल्ली तालुका प्रतिनिधी✒️
एटापल्ली:- 15 मार्च ला एटापल्लीचे तहसीलदार यांना कोतवाल संघटना एटापल्ली चे कोतवाल बांधवां तर्फे निवेदन देण्यात आले. माहे जानेवारी व फेब्रुवारी 2021 या दोन महिन्यांचे वेतन थगीत असल्यामुळे या महागाई च्या दिवसात आर्थिक परिस्तिथी ला समोर जावे लागत आहे. तसेच एटापल्ली तालुक्यात बहुतांश कोतवाल बांधव बी.एल.ओ म्हणून काम करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून बी.एल.ओ चे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे कोतवाल बांधवांवर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अटल निवृत्ती वेतन योजना, राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळालेला नाही.

दिनांक 6 फेब्रुवारी 2019 शासन निर्णानुसार कोतवाल मानधन वाढ, आरोग्य अपघात योजना सामाजिक सुरक्षा प्रधान करण्यासाठी लागू केलेले आहे, परंतु अद्यापही ही योजना लागू झालेल्या नाही, उपरोक्त योजना निर्णय दिनांक 1 फेब्रुवारी 2019 पासून लागू झाला आहे, त्यामुळे या योजना त्या त्या अती नुसार त्याच तारखे पासून अंबलबजावणी करावी व त्वरित निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली.

यावेळी उपस्थित कोतवाल विलास चांदेकर तालुकाध्यक्ष, कालिदास गेडाम जिल्हा अध्यक्ष,
प्रकाश पूंघाती जिल्हा संघटक सचिन गेडाम तालुकाउपाध्यक्ष व अनिल कुंभारे, देवचंद भांडेकर व अंतरम पुंघती इतर कोतवाल उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here