बैठकीत २० हून अधिक स्टेशन मास्टरांनी उपस्थिती, स्टेशन मास्तरांच्या समस्या आणि मागण्यांवर झाली चर्चा

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं :- ९७६८५४५४२२
बदलापूर, १९ मार्च : आॅल इंडिया स्टेशन मास्टर्स असोशिएशनची महत्वाची बैठक बुधवारी ठाण्यातील स्टेशन मास्टरांच्या कार्यालयात पार पडली. आर. के. मीना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत २० हून अधिक स्टेशन मास्टरांनी उपस्थिती दर्शवली.
ठाण्यातील स्टेशन मास्टरांच्या बुधवारी १६ मार्च रोजी कार्यालयात झालेल्या बैठकीत रात्र पाळीचा भत्ता, भर्ती, गरजेचे फर्निचर साहित्य अशा विविध मुद्द्यांवर चर्चा बैठकीत झाली. या बैठकीत ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनचे वरिष्ठ नेते अरोरा, काशीकर, पांडेसाहित इतर २० स्टेशन मास्टर उपस्थित होते, अशी माहिती ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनचे पदाधिकारी कुमार कुंदन यांनी दिली.