भंडारा जिल्ह्याच्या आरटीओ पोलीसांच्या सतर्कतेने २७ जनावरांची सुटका 

भंडारा जिल्ह्याच्या आरटीओ पोलीसांच्या सतर्कतेने २७ जनावरांची सुटका 

भंडारा जिल्ह्याच्या आरटीओ पोलीसांच्या सतर्कतेने २७ जनावरांची सुटका 

✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
📱 8308726855 📱
📞 8799840838 📞

भंडारा :- विदर्भातील भंडारा जिल्हा हा अवैदय धंद्यानी नवाजलेला जिल्हा आहे. दिनांक १६ मार्च २०२२ रोज बुधवारला निर्दयतेने कोंबुन कत्तलीसाठी जनावरे जात असल्याचा प्रकार आरटीओ निरीक्षकाच्या लक्षात येताच २७ जनावरांची सुटका करण्यात आली. ही कार्यवाही बुधवारी रात्री भंडारा शहरातील मदार चौकात करण्यात आली.
यातील आरोपी नामे इर्शाद निशार खान वय ३१ वर्षे राहणार मौजा चंगेरा, जिल्हा गोंदीया असे आरोपीचे नाव आहे. ट्रक क्रमांक एम. एच. ३५ जे १६७७ मध्ये गोवंशाची वाहतुक होत असल्याच्या प्रकार आरटीओ निरीक्षक श्री. चाऊस सर यांच्या लक्षात आला , त्यांनी तत्काळ ही माहिती पोलीसांना दिली. पीलीस उपनिरीक्षक श्री. मंगेश नागरगोजे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करून जनावरांची सुटका केली.
जनावरांची रवानगी चांदोरी येथील भागीरथी गोशाळेत केली असुन ट्रकचालक इर्शाद खान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गावर गत काही वर्षांपासून जनावरांची अवैध वाहतुक केली जाते. पोलीस वारंवार कार्यवाही करतात, परंतु कायमचा बंदोबस्त होत नसल्याने जनावर तस्करांचे मनोबल वाढले आहे.
गत मोहाडी तालुक्यातील माता चौंडेश्वरी मंदीर ते मांडेसर इजिमा रोडने हे सकाळी 3:30 वाजता आपले डाला डग्याने दररोज सहापूर ते नागपूर या रोडने कत्तल करण्याकरिता जनावरे घेऊन जातात अशी माहीती आहे, तरीपण पोलीस स्टेशन मोहाडी, पोलीस स्टेशन वरठी, व पोलीस स्टेशन शहापुर यांना माहिती असल्यावरही या डग्यावर कोणतीच कार्यवाही करत नव्हती. उलट त्यांच्या कडून रोडच्या साईडला जाउन मांडवली केली जात असे अशी माहिती आहे.
परंतु आज भंडारा जिल्हा पोलीसांनी खरी कामगीरी बजावल्याचे स्पष्ट दिसत आहे.
असेच जर पोलीसांनी आपली भुमीका निभवली तर हे दोन नंबरचे अवैध धंदे हळू हळू कमी होईल. अशी समज मांडेसर, पिंपळगाव, नेरी, सातोना, मोहदुरा, शहापूर अशा रोडवरचे गावांनी समझ दिली आहे.